The minor girl's crying was heard on the counter of the shop and a disgusting incident was revealed | दुकानाच्या काउंटरवर ऐकू आला बालिकेच्या रडण्याचा आवाज अन् उघडकीस आली घृणास्पद घटना 

दुकानाच्या काउंटरवर ऐकू आला बालिकेच्या रडण्याचा आवाज अन् उघडकीस आली घृणास्पद घटना 

ठळक मुद्देजानी भागातील गावात एक मुलगी आपल्या घराजवळ किराणा दुकानात सामान घेण्यासाठी गेली. दुकान मालक आणि काका यांनीतिला दुकानात पूस लावून  बोलावले असा आरोप आहे.

जानीखुर्द (मेरठ) - जानी परिसरातील खेड्यात एका १२ वर्षांच्या मुलीने बलात्कार करण्यास प्रतिकार केल्याने आरोपी काका-पुतण्याने तिला मारहाण केली आणि तिला गंभीर जखमी केले. यानंतर त्याला दुकानातील काऊंटरमध्ये बंद करण्यात आले. अल्पवयीन बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकून जेव्हा ग्राहकाला संशयास्पद वाटले तेव्हा आरोपी दुकानदार तेथून पळून गेला. पीडित मुलीला मेरठच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचवेळी, चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जानी भागातील गावात एक मुलगी आपल्या घराजवळ किराणा दुकानात सामान घेण्यासाठी गेली. दुकान मालक आणि काका यांनीतिला दुकानात पूस लावून  बोलावले असा आरोप आहे. यानंतर दुकानाचे शटर खाली ओढले आणि त्यांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने विरोध दर्शविला असता दोन्ही आरोपींनी तिला मारहाण केली आणि तिला गंभीर जखमी केले. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिचा मृत्यू झाल्याचं समजून दोन्ही आरोपींनी दुकानातील काऊंटरमध्ये बंद केले. यानंतर दुकान उघडले. यावेळी एक गावकरी सामान घेण्यासाठी दुकानात आला. त्याने बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकला. यावर त्याने दुकान मालकाला विचारले आणि दुकानमालक घाबरून पळाला. गावकऱ्याने काउंटर उघडला आणि तेथे पीडित मुलगी आढळली. दोन्ही आरोपी दुकानातून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले.

जखमी मुलीला तात्काळ मेरठच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उशिरा तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याचवेळी मुलीच्या वडिलांनी आरोपी मुनीर आणि जग्गाविरोधात गुन्हा केल्याचे आणि मुनीरच्या आई-वडिलांविरूद्ध धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर जानी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोपींना लवकरच अटक केली जाईल.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 


सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

 

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

 

Sushant Singh Rajput Case : 'क्या तुम्हारे पास माल है?' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश

 

नवीन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वीकारला पदभार

 

ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार

 

 

Web Title: The minor girl's crying was heard on the counter of the shop and a disgusting incident was revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.