सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

By पूनम अपराज | Published: September 21, 2020 05:45 PM2020-09-21T17:45:41+5:302020-09-21T18:25:25+5:30

Sushant Singh Rajput Case : उद्या म्हणजेच मंगळवारी सीबीआय आणि एम्स टीम यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही टीम सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित तपासणीच्या तपशीलांवर चर्चा करणार आहे.

Sushant Singh Rajput Case : Suspicion of Sushant's death likely to be solved, important meeting of CBI and AIIMS team tomorrow | सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

Next
ठळक मुद्देअभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करणारे केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मंगळवारी एम्सच्या मेडिकल बोर्ड (एम्स) बरोबर एक महत्त्वपूर्ण बैठक घेईल, अशी माहिती वृत्तसंस्था आयएएनएसने सोमवारी दिली.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूचे रहस्य दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, सीबीआय आणि एम्स रुग्णालयाचे पथक या प्रकरणाची सातत्याने चौकशी करत आहेत. तथापि, सुशांत सिंग राजपूतचा मृत्यूआत्महत्या की हत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही. सीबीआयची टीम या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सातत्याने तपास करत आहे. दरम्यान, उद्या म्हणजेच मंगळवारी सीबीआय आणि एम्स टीम यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही टीम सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित तपासणीच्या तपशीलांवर चर्चा करणार आहे.


अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची चौकशी करणारे केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) मंगळवारी एम्सच्या मेडिकल बोर्ड (एम्स) बरोबर एक महत्त्वपूर्ण बैठक घेईल, अशी माहिती वृत्तसंस्था आयएएनएसने सोमवारी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय आणि सीएफएसएलच्या पथकांनी केलेल्या तपासणीच्या निष्कर्षांवर या बैठकीत चर्चा केली जाईल. विशेष म्हणजे सीबीआयच्या पथकाने मुंबईत राहून सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूची सातत्याने चौकशी केली आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ची फॉरेन्सिक टीम दक्षिण दिल्लीतील लोधी रोड भागात मुख्यालयात सीबीआयच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) टीम सदस्यांची भेट घेईल.

सूत्रांनी सांगितले की, सीबीआय आणि सीएफएसएलच्या एसआयटी अहवालाचा अभ्यास केल्यानंतर सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात काही तथ्य लपलेले आहे की नाही याबाबत एम्स मेडिकल बोर्ड अंतिम निर्णय घेईल. सूत्रांनी सांगितले की, सीबीआय आपले तपास तपशील एम्सच्या फॉरेन्सिक टीमसमवेतही सांगेल आणि त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार असल्याची माहिती जागरणने दिली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

 

मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

 

 

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

 

एटीएम फोडण्याचा डाव् उधळला, चार अल्पवयीन मुले ताब्यात

 

 

Web Title: Sushant Singh Rajput Case : Suspicion of Sushant's death likely to be solved, important meeting of CBI and AIIMS team tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.