अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

By पूनम अपराज | Published: September 21, 2020 02:57 PM2020-09-21T14:57:35+5:302020-09-21T14:58:40+5:30

चित्रपट निर्माते कश्यप यांनी एकदा तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्री घोष यांनी केला आहे. कश्यप तिच्यासमोर नग्न असल्याचा दावा घोषने केला असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे.

Payal can lodge a complaint against Anurag Kashyap at Oshiwara police station | अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देकाल रात्री एक वाजेपर्यंत लोकसभेची कार्यवाही सुरू होती. या दरम्यान गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी संसदेत अनुराग कश्यप यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अनुराग कश्यप यांचे नाव न घेता दरिंदा म्हणून संबोधित केले.लोकमतशी बोलताना वकील नितीन सातपुते यांनी आज रात्री ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. 

अभिनेत्री पायल घोष हिने लावलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप चर्चेत आहे. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे पायलने म्हटले आहे. कालच अनुरागने स्वत:वरचे हे सगळे आरोप नाकारले होते. आज त्याच्या वकीलाने एक स्टेटमेंट जारी करत, अनुरागवरचे लैंगिक गैरवर्तनाचे आरोप खोटे असल्याचा दावा केला. त्यातच अभिनेत्री पायल घोषचे वकील नितीन सातपुते हे  अनुराग कश्यपविरोधात आज सायंकाळी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू शकतात. चित्रपट निर्माते कश्यप यांनी एकदा तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्री घोष यांनी केला आहे. कश्यप तिच्यासमोर नग्न असल्याचा दावा घोषने केला असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे. लोकमतशी बोलताना वकील नितीन सातपुते यांनी आज रात्री ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. 

संसदेत पायल घोष यांचे प्रकरण
काल रात्री एक वाजेपर्यंत लोकसभेची कार्यवाही सुरू होती. या दरम्यान गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी संसदेत अनुराग कश्यप यांचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी अनुराग कश्यप यांचे नाव न घेता दरिंदा म्हणून संबोधित केले. ते म्हणाले की, देशातील आमच्या मुली दुर्गा देवीसारखे पूज्य आहेत, पण बॉलिवूडमध्ये असे काही लोक आहेत जे आपले नशिब उजळून टाकण्याचा दावा करतात आणि त्यांच्याशी सौदेबाजी करतात. भाजप खासदाराने या विषयावर कडक कायदा करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कायद्याची भीती निर्माण होईल. २ दिवसांपूर्वी अनुराग कश्यप यांनी खासदार रवी किशन यांच्यावर गांजा पिण्याचा आरोप केला होता.

आईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने 2014 मधील घटनेविषयी खुलासा केला आहे. पायल यांनी सांगितले की, 2014 मध्ये अनुराग कश्यपने माझा विनयभंग केला. दिग्दर्शकाने मला सांगितले की, त्याच्यासोबत काम करणार्‍या मुली त्याच्याबरोबर 'गाला टाइम' घालवतात.

पायल यांनी सांगितले की, अनुराग त्यावेळी बॉम्बे वेलवेटवर काम करत होता. रणबीर कपूरबरोबर फक्त एकच चित्रपट करण्यासाठी मुली त्याच्याबरोबर झोपायला तयार असल्याचेही कश्यपने तिने सांगितले. यानंतर, अनुरागने एक प्रौढ चित्रपट दाखवण्यास सुरवात केली. मला भीती वाटायला लागली. यानंतर, तो अचानक माझ्या समोर नग्न झाला आणि मला माझे कपडे काढण्यास सांगितले. मी म्हणाले सर मला काही कंफर्टेबल नाही वाटत असे सांगितले असल्याचा खळबळजनक खुलासा पायलने केला.

ते पुढे म्हणाले की, अनुरागने सांगितले की मी काम केलेल्या अभिनेत्री फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यास तयार आहेत. मग मी पुन्हा म्हणाले की, मला कंफर्टेबल नाही वाटत आणि मी आजारी आहे. कसं तरी मी तेथून पळाले. यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्याने मला बर्‍याच वेळा भेटण्यास सांगितले. मी आजपर्यंत ती घटना विसरू शकले नाही आणि यामुळे मला खूप त्रास होतो, असं पायलने सांगितलं असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे. 

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

 

मासे खायला दिले नाहीत म्हणून पुतण्यांनी काकाला बेदम मारलं; मारहाणीत झाला मृत्यू

 

Web Title: Payal can lodge a complaint against Anurag Kashyap at Oshiwara police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.