Jaya Saha may get arrested, NCB interrogated second day in a row | जया साहा हिच्यावर अटकेची टांगती तलवार, NCB कडून सलग दुसऱ्यादिवशी कसून चौकशी

जया साहा हिच्यावर अटकेची टांगती तलवार, NCB कडून सलग दुसऱ्यादिवशी कसून चौकशी

ठळक मुद्देतिच्याकडील चौकशीतून अनेक बॉलीवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्रीची नावे  ड्रग कनेक्शनमध्ये समोर येत आहेत.

मुंबई -  अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला अंमली पदार्थ पुरविल्याप्रकरणी तिची माजी टेलेन्ट मॅनेजर जया साहा हिच्या अडचणीत वाढ झाली असून सलग दुसऱ्यादिवशी एनसीबीकडून कसून चौकशी करण्यात आली. कोणत्याही क्षणी तिला अटक केली जाण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.
    

तिच्याकडील चौकशीतून अनेक बॉलीवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्रीची नावे  ड्रग कनेक्शनमध्ये समोर येत आहेत. त्यांनाही लवकरच चौकशीला पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड व  अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने  जया साहा  हिच्यासोबत ड्रगसंबधी चॅट केल्याचे उघड झाल्यानंतर एनसीबीने तिच्याविरुद्ध मागच्या महिन्यात गुन्हा दाखल केला आहे.  सोमवारपासून तिला प्रत्यक्षात चौकशीसाठी पाचारण केले जात आहे. काल सुमारे पाच तास चौकशी केल्यानंतर मंगळवारी दुपारी तिला पुन्हा पाचारण करण्यात आले. याप्रकरणी अटक केलेल्या ड्रग तस्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार  जया ही बॉलीवूडमध्ये अन्य  ड्रग्जचे सेवन करणाऱ्या अन्य सिलेब्रिटीच्या संपर्कात होती. त्याबाबत अधिकाऱ्यांकडून विचारणा केली जात आहे. मोबाईलवरील व्हॉटसअप चॅटवर त्यासंबंधी नावे  मिळून आली आहेत, त्यानुषंगाने तिचा अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या हिरोईन, त्याचा पुरवठा करणाऱ्या तस्कराशी संबधाबाबत विचारणा केली जात आहे.तिची अटक अटळ असून मंगळवारी रात्रीपर्यंत चौकशी सुरु होती. ती पूर्ण न झाल्यास तिला बुधवारी पुन्हा पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


 डी, के, एन या अद्याक्षराच्या तारका ड्रगशी कनेक्ट
    

जया सहा हिच्याकडून बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शन बाबत अनेक महत्वपूर्ण माहिती मिळविल जात आहे. तिच्या मोबाईल चॅटवर ड्रग घेणाऱ्या काही अभिनेत्रीच्या आद्याक्षराचा उल्लेख आहे. त्यामध्ये  डी, के, एन, आर या शब्दाचा उल्लेख आहे. त्यामुळे त्याबाबत दीपिका पादुकोन, दिया मिर्झा, सारा अली, श्वेता कपूर, रिकुप्रीत सिंग आदीच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र त्याबाबत अद्याप पर्यंत कोणालाही समन्स काढण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 


सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

 

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

 

Sushant Singh Rajput Case : 'क्या तुम्हारे पास माल है?' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश

 

नवीन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वीकारला पदभार

 

ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार

 

दुकानाच्या काउंटरवर ऐकू आला बालिकेच्या रडण्याचा आवाज अन् उघडकीस आली घृणास्पद घटना 

 

 

Web Title: Jaya Saha may get arrested, NCB interrogated second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.