शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
9
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
10
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
11
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
12
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
13
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
14
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
15
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
16
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
17
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
18
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
19
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
20
​मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जॉन अब्राहम' म्हणून करत, अमित ठाकरेंची व्हीआयपी संस्कृतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 23:05 IST

व्हिसाचे उल्लंघन करणे, अमली पदार्थ व्यवहार, जामीन अटींचे उल्लंघन  आणि मारामारी अशा गुन्ह्याशी अनेकवेळा संबंध आलेला अटाला हा कळंगूट येथे राहत असताना रशीयन नागरिकाला मारहाण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केली होती.

ठळक मुद्दे या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने त्याला जामीन नाकारल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्याने धाव घेतली होती.९ मार्च २०१० मध्ये त्याला अटक झाली होती तर  ४ सप्टेंबर २०१० मध्ये त्याची सशर्तजामीनवर सुटका झाली होती. नंतर जामीन नियमाचे उल्लंघन करून तो देशाबाहेर पळून गेला होता.

वासुदेव पागी

पणजी: एकेकाळी गाजलेल्या ड्रग्स - पोलीस साटेलोटे प्रकरणात अटक करण्यात आलेला इस्रायली नागरीक यानिव बेनाईम ऊर्फ अटाला हा त्या प्रकरणात केवळ ४ महिने तुरुंगात राहिला होता. तोच अटाला एका मारामारीच्या प्रकरणात एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगात अडकला आहे. त्याच्या जामीन अर्जावर  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात १० रोजी सुनावणी होणार आहे.


व्हिसाचे उल्लंघन करणे, अमली पदार्थ व्यवहार, जामीन अटींचे उल्लंघन  आणि मारामारी अशा गुन्ह्याशी अनेकवेळा संबंध आलेला अटाला हा कळंगूट येथे राहत असताना रशीयन नागरिकाला मारहाण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अटक केली होती. २४ एप्रील २०२० रोजी त्याला अटक क रण्यात आली होती. भारतीय दंडसंहिता कलम ३०७ अंतर्गत  खूनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. परंतु हे कलम नंतर उशिरा लावण्यात आले होते.


या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने त्याला जामीन नाकारल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्याने धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी एक सदस्यीय खंडपीठासमोर मंगळवारी होणार होती, परंतु ती होवू शकली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी ही १० जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.
अटक करण्यात आल्यापासून आतापर्यंत जवळ जवळ एक वर्ष आणि २ महिने अटाला तुरुंगात आहे. मुख्य म्हणजे एका मागे एक अशी गुन्ह्यांच्या शृंखलेत अडकलेला अटालाचा हा तुरुंगात घालविलेला सर्वाधिक काळ आहे. यापूवी २०१० मध्ये गोव्यातील गाजलेल्या ड्रग्स प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती. किंबहुना त्याच्या अटकेनंतरच हे ड्रग्स प्रकरणाची व्यापकता उघडकीस आली होती. हे प्रकरण नंतर सीबीआयकडेही सोपविण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतरही त्याला केवळ ४ महिन्याहून अधिक काळ तुरुंगात रहावे लागले नव्हते. ९ मार्च २०१० मध्ये त्याला अटक झाली होती तर  ४ सप्टेंबर २०१० मध्ये त्याची सशर्तजामीनवर सुटका झाली होती. नंतर जामीन नियमाचे उल्लंघन करून तो देशाबाहेर पळून गेला होता. नंतर इंटरपोलच्या मदतीने त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती, परंतु नंतर लवकरच तो सुटला होता.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थjailतुरुंगgoaगोवाPoliceपोलिसIsraelइस्रायल