शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 21:02 IST

Sushant Singh Rajput Case : रिया चक्रवर्ती जेलमध्ये असे घालवत आहे दिवस

ठळक मुद्देपुढचे आणखी काही दिवस रियाच्या नशिबात भायखळा तुरुंगातील चटईवर झोपण्याची वेळ आली आहे. रियाला झोपण्यासाठी ना बेड, ना पंखा, ना उशी अशा अवस्थेत रिया दिवस घालवत आहे.  रियाची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आलेली असून कोठडीत तिला एकटीला ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रियाला कोठडीत एकटीला ठेवण्यात आलं आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज जाळ्याच्या तपास करणाऱ्या एनसीबीने मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मंगळवारी अटक केली आहे. त्यानंतर कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आता भायखळा तुरुंगात रिया आहे. दोन वेळा रियाचा जामीन कोर्टाने फेटाळला आहे. तिचे वकील सतीश मानेशिंदे आता मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात. त्यामुळे पुढचे आणखी काही दिवस रियाच्या नशिबात भायखळा तुरुंगातील चटईवर झोपण्याची वेळ आली आहे. रियाला झोपण्यासाठी ना बेड, ना पंखा, ना उशी अशा अवस्थेत रिया दिवस घालवत आहे.  अमली पदार्थ विकत घेणे, त्यासाठी अन्य आरोपींशी संगनमत करणे, याबाबत चॅट हे रियाविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा ‘एनसीबी’ने केला आहे. अमली पदार्थाचे सेवन कधीच केले नाही, असा दावा रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये केला होता. मात्र, आपण शोविक, रियाच्या सांगण्यावरून अनेकदा अमली पदार्थ सुशांतच्या घरी आणले होते असल्याचं सुशांतचा कुक दीपेश सावंत याने चौकशीदरम्यान कबुल केल्याचे एनसीबीने न्यायालयासमोर सांगितले.रियाची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आलेली असून कोठडीत तिला एकटीला ठेवण्यात आलं आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रियाला कोठडीत एकटीला ठेवण्यात आलं आहे. रियाच्या शेजारच्या कोठडीत शीन बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकऱणामुळे रिया चक्रवर्ती चर्चेत असून तिच्यावर सहकारी कैद्यांकडून हल्ला होण्याची भीती असल्यानेच सर्वांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. एका बॉलिवूडच्या अभिनेत्रीला सर्वसामान्य कैद्यांप्रमाणे कोरोना महामारीमुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध तुरुंगात दिले जाते. मुंबईत महिलांसाठी एकमेव कारागृह असणाऱ्या भाखळ्यातील तुरुंगात गेल्या काही महिन्यात अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.

दोन पोलीस कॉन्स्टेबल सतत तीन शिफ्टमध्ये रूपावर नजर ठेवून पहारा देत असतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाला झोपण्यासाठी चटई देण्यात आली आहे. बेड किंवा उशीची कोणतीही व्यवस्था नाही. तुरुंगामध्ये पंखाही नसून जर न्यायालयाने परवानगी दिली तर टेबल फॅन दिला जाईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र, तोपर्यंत रियाला पंख्याशिवाय तुरुंगात रात्रं काढावी लागणार आहे. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रिया मुख्य आरोपी आहे. तसेच आर्थिक गैरव्यवहाराबाबत सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केलेल्या आरोपप्रकरणी ईडीने रियाची चौकशी केली आहे. त्यावेळी रिया आणि अन्य आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केलेले व्हॉट्स अ‍ॅप मेसेज ईडीने प्राप्त केले. त्यातून रिया आणि अन्य आरोपी ड्रग्ज सप्लायर्सच्या संपर्कात होते, अशी माहिती उघड झाली. त्यानंतर एनसीबीने गुन्हा नोंदवून या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

 

बॉयफ्रेंडसोबत पत्नी हॉटेलमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळली, पतीने चप्पलेने हाणले 

 

दणका! रियासह इतर आरोपींचा जामीन कोर्टाने फेटाळला

 

सुशांतच्या फ्लॅटच्या टेरेसवर वारंवार जात होती सीबीआय आणि फॉरेन्सिक टीम  

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतDeathमृत्यूjailतुरुंगCBIगुन्हा अन्वेषण विभाग