शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ऑर्डर, ऑर्डर... कोर्टात खोकलेला आरोपी निघाला कोरोनो पॉझिटिव्ह; १७ पोलीस क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 16:09 IST

लोकल फोकल पॉईंट पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस अधिकारी यांचा देखील या १७ पोलिसांमध्ये सहभाग आहे.

ठळक मुद्देगुरुवारी आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाल्यानंतर १७ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ६ एप्रिलला आरोपी सौरवला कोर्टात हजर केले त्यावेळी जज यांना त्याला ताप आणि खोकला असल्याचं दिसून आले. 

लुधियाना - पंजाबमध्ये अटक करण्यात आलेल्या वाहन चोराला करोनाची लागण झाली असल्याचं धक्कादायक माहिती कोर्टात जजसमोर खोकल्यानंतर केलेल्या डॉक्टर तपासात उघडकीस आली. गुरुवारी आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाल्यानंतर १७ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. लोकल फोकल पॉईंट पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस अधिकारी यांचा देखील या १७ पोलिसांमध्ये सहभाग आहे.  

लुधियानामध्ये या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांप्रमाणे जज आणिन्यायालयातील कर्मचारी यांनाही स्वविलगीकरणात राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. वाहनांची चोरी करणाऱ्या सौरव सेहगल (२५) अटक करुन ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले. जीवन नगर पोलीस ठाण्याच्या जेलमध्ये त्याला एका दिवसासाठी ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी दोन स्थानिकांच्या मदतीने या चोराला बेड्या ठोकल्या. चोराच्या कुटुंबातील ११ सदस्यांनाही गणेश नगर येथील परिसरात क्वारंटाइन करण्यात आले आहे.

६ एप्रिलला आरोपी सौरवला कोर्टात हजर केले त्यावेळी जज यांना त्याला ताप आणि खोकला असल्याचं दिसून आले. नंतर त्यांनी पोलिसांना त्याची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी सौरव सेहगल आणि त्याच्या साथीदाराला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याआधी वैद्यकीय तपासणी करुन घेतली. यावेळी सौरव कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झालं. यानंतर १७ पोलिसांसह जज आणि न्यायालयातील कर्मचाऱ्यांना स्वविलगीकरणात राहण्याची सूचना देण्यात आली आहे. 

 

वैद्यकीय तपासणीस नेताना दुसरा चोर झाला फरार 

वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेत असताना सौरवचा साथीदार नवज्योत सिंह याने पळ काढला. सोनसाखळी चोरी प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव आजारी वाटत होता, मात्र नवज्योतची प्रकृती ठणठणीत होती. मात्र, सौरवच्या संपर्कात आल्याने त्यालाही करोनाची लागण झाल्याची शक्यता असल्याने पोलीस त्याला शोधत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंगCourtन्यायालयPunjabपंजाबRobberyचोरीArrestअटकPoliceपोलिस