शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

२०२० मध्ये एक हजार २३४ दुचाकी चोरीस; १९३ दुचाकींचा लागला शोध, २३१ चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 01:31 IST

अनेकदा  हौसेखातर, कधी प्रेयसीवर प्रभाव पाडण्यासाठी, तर सोनसाखळी चोरण्यासाठी दुचाकींची चोरी केल्याचे या चोरट्यांच्या चौकशीतून पुढे आले आहे

जितेंद्र कालेकरठाणे :  शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून गेल्या वर्षभरात (२०२०) एक हजार २३४ दुचाकींची चोरी झाली. त्यातील १९३ दुचाकींचा शोध लागला असून २३१ चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. अलिकडेच मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात पोलिसांनीचोरीला गेलेल्या दुचाकी फिर्यादींना परत दिल्या आहेत.

अनेकदा  हौसेखातर, कधी प्रेयसीवर प्रभाव पाडण्यासाठी, तर सोनसाखळी चोरण्यासाठी दुचाकींची चोरी केल्याचे या चोरट्यांच्या चौकशीतून पुढे आले आहे. बरेचदा अत्यंत साधे कुलूप असलेली किंवा हॅण्डल लॉक नसलेली दुचाकी हेरली जाते. त्यानंतर संधी साधून ती या चोरट्यांकडून चोरली जाते. शहर किंवा ग्रामीण भागातून चोरलेली दुचाकी थेट दुसऱ्या जिल्ह्यात किंवा परराज्यांतील एखाद्या खेड्यात विकली जाते. दीड दोन लाखांची दुचाकी अवघ्या १० ते ५० हजारांमध्ये विकल्याचे सांगितले जाते. 

चोरीसाठी वापरअनेकदा दुचाकींची एका भागातून चोरी केली जाते नंतर दुसऱ्या भागातील एखाद्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र किंवा चेन जबरीने चोरण्यासाठी किंवा मोबाइल हिसकावण्यासाठी या चोरीच्या दुचाकींचा क्रमांक बदलून वापर केला जातो. या दुचाकीनंतर मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेशात अल्प किमतीत विकल्या जातात, असेही तपासात पुढे आल्याचे पोलीस  सांगतात.

३२० दुचाकींचा तपास२०१९ मध्ये ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांच्या कार्यक्षेत्रातून एक हजार १९२ दुचाकींची चोरी झाली. त्यातील निम्यापेक्षाही कमी म्हणजे ३२० दुचाकींचा शोध घेण्यात यश आले. 

दुचाकी चोरल्यानंतर तिची स्वस्तात विक्री होते. अशावेळी खरेदी करणाऱ्यांनीही तिची कागदपत्रे आरटीओ कार्यालयातून पडताळली पाहिजेत. अशा दुचाकींची खेडेगावात १० हजारांतही विक्री होते. दुचाकी मालकांनी चांगले लॉक लावले पाहिजे. गेल्या वर्षभरात २३१ आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.  - लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस