NCB handcuffs relative of gangster Karim Lala and aides of underworld don Dawood | अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, गँगस्टर करीम लालाच्या नातेवाईकाला NCB ने ठोकल्या बेड्या 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, गँगस्टर करीम लालाच्या नातेवाईकाला NCB ने ठोकल्या बेड्या 

ठळक मुद्देएनसीबीने गँगस्टर चिंकू पठाणला अटक केली आहे. त्याला नवी मुंबईतील घणसोली येथून अटक करण्यात आली आहे.

एनसीबीने मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि गँगस्टर करीम लालचा नातेवाईक चिंकू पठाणला बेड्या ठोकल्या आहे. एनसीबी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या कारवाया करत आहे. याच कारवाईदरम्यान, एनसीबीने गँगस्टर चिंकू पठाणला अटक केली आहे. त्याला नवी मुंबईतील घणसोली येथून अटक करण्यात आली आहे.

एनसीबीची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. चिंकू पठाण हा गँगस्टर करीम लालाचा खास हस्तक असून नातेवाईकही आहे. महत्वाचे म्हणजे तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा देखील हस्तक असल्याची NCB ची माहिती आहे. चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. त्याला अटक केल्यानंतर ड्रग्ज तस्कारांना मोठा धसका घेतला आहे.

Web Title: NCB handcuffs relative of gangster Karim Lala and aides of underworld don Dawood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.