शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

महिला खेळाडूचे कनेक्शन उघड; अटक कुस्तीपटू सुशील कुमारला मदत केल्याचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 15:22 IST

Sagar Dhankhar Murder : या संपूर्ण पोलीस तपासातून सुशील कुमारला मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये एका महिला खेळाडूचे नाव समोर आल्याने खळबळ माजली आहे. 

ठळक मुद्देही महिला हँडबॉल खेळाडू असून तिने दोन वेळा एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमारला ज्युनियरकुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे. सुशीलच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक महत्वाचे खुलासे होत आहेत.तसेच सुशीलच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी हरियाणा, पंजाबसह अनेक ठिकाणी धाडी देखील टाकल्या आहेत. या संपूर्ण पोलीस तपासातून सुशील कुमारला मदत करणाऱ्या व्यक्तींमध्ये एका महिला खेळाडूचे नाव समोर आल्याने खळबळ माजली आहे. 

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात रविवारी एक स्कुटी जप्त केली आहे. ही स्कुटी पश्चिम दिल्लीमध्ये राहणाऱ्या एका महिला खेळाडूची असल्याचे तपासात उघड झाले आहे.  सुशील कुमार आणि अजय कुमार हे शनिवारी रात्री या महिला खेळाडूच्या घरी थांबले होते. त्यानंतर ते स्कुटीने दुसरीकडे जाणार होते. ही महिला हँडबॉल खेळाडू असून तिने दोन वेळा एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता या महिलेची चौकशी होणार असून या चौकशीत नवे महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. 

सुशील कुमार आणि सागर धनखड यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद होते अशी माहिती उघडकीस आली आहे. या मारहाणीनंतर सुशील कुमार दोन आठवडे फरार होता. त्याच्यावर पोलिसांनी १ लाखाच्या बक्षीसाची घोषणाही केली होती. सुशील कुमारने या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धावही घेतली. मात्र, त्याला अटकपूर्व जामीन मिळाला नाही. सुशील कुमारवर भादंवि कलम ३०२, ३६५, १२० - ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

डोक्यावर बोथट  वस्तूने वार

जहांगीरपुरी येथील बीजेआरएमएच रुग्णालयाचे डॉ. मुनीष वाधवन यांच्या अहवालानुसार तपासणीसाठी व्हिसेरा आणि रक्ताचे नमुने सील करण्यात आले आहेत. डोक्यावर बोथट वस्तूने वार केल्यामुळे सागरचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या मते शरीरावर आढळलेल्या सर्व खुणा मृत्यूच्या अगोदरच्या आहेत.

रेल्वे केले निलंबित 

कुस्तीपटू सागर धनखड खून प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमार याला पुढील आदेश येईपर्यंत रेल्वेने वरिष्ठ कमर्शियल मॅनेजर पदावरून निलंबित केले आहे. सुशीलचे निलंबन २३ मे पासून लागू करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत तो निलंबित राहील. सुशीलला कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपात  २ दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. हत्येच्या आरोपावरून सुशील कुमारविरोधात चौकशी सुरू झाल्यानंतरच रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीWrestlingकुस्तीSushil Kumarसुशील कुमारPoliceपोलिसWomenमहिलाdelhiदिल्ली