शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटधारकाची कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीस बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 21:33 IST

मुंबई - प्लॅटधारकाच्या प्लॅटवर बँकेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे चार कोटीचे कर्ज मंजूर करून घेऊन प्लॅटधारकास चुना लावल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांच्या ...

ठळक मुद्देतक्रारदार वांद्रे येथे राहणार असून त्यांच्या मालकी हक्काचा आलिशान फ्लॅट त्यांनी विक्रीसाठी काढला होता. आता या प्रकरणात हार्दिक नितीन गोठी याचा समावेश असून या मुख्य आरोपीस अटक करून त्याला वांद्रे येथील कोर्टात हजर करण्यात आले.

मुंबई - प्लॅटधारकाच्या प्लॅटवर बँकेतून बनावट कागदपत्रांच्या आधारे चार कोटीचे कर्ज मंजूर करून घेऊन प्लॅटधारकास चुना लावल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांच्या पथकाने याआधी एका आरोपीला अटक केलेली आहे. आता या प्रकरणात हार्दिक नितीन गोठी याचा समावेश असून या मुख्य आरोपीस अटक करून त्याला वांद्रे येथील कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच गुन्ह्यात पूर्वी पोलिसांनी प्रकाश हिराराम मारू याला अटक केली आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात गोठी याला ४० लाखाची रक्कम मिळाली होती.तक्रारदार वांद्रे येथे राहणार असून त्यांच्या मालकी हक्काचा आलिशान फ्लॅट त्यांनी विक्रीसाठी काढला होता. त्याकामासाठी तक्रारदार यांचा मित्र अरिफ सय्यद याला त्यांनी सांगितले. आरिफ आणि इस्टेट एजंट यांना तक्रारदार यांनी माहिती दिली. साधारण जून २०१७ मध्ये आरिफ सय्यद याच्या ओळखीचा इसम असलेल्या अब्दुल्ला खान उर्फ पप्पू याने तक्रारदार यांना संपर्क साधला आणि सांगितले की, त्याचा मित्र नरेंद्र अगरवाल याला हा फ्लॅट घेण्यात रस आहे. तसेच पप्पू तक्रारदाराकडे त्यासारख्या राहत्या घरी अगरवालला घेऊन गेला. त्यावेळी हा फ्लॅट ५ कोटी ४२ लाख रुपयांना विकण्याचे ठरले. त्यावेळी फ्लॅट खरेदीस इच्छुक असलेल्या नरेंद्र अगरवाल याने रक्कम जास्त असल्याने बँकेचे कर्ज घ्यावे लागेल असे सांगितले.त्यावेळी नरेंद्र यांचा मित्र राकेश चक्रवर्ती याने बँकेतून कर्ज काढून देण्याची तयारी दाखविली. फ्लॅटच्या खरेदी आणि विक्रीचा व्यवहार करून करार करू असे सांगून टोकण म्हणून १० लाखाची रक्कम तक्रारदार यांना द्यावी असा व्यवहार ठरला. उर्वरित रक्कम ५ कोटी ३२ लाख रुपये कर्ज काढून देण्याचा निश्चित केले. आणि कर्जाची प्रक्रिया सुरु झाली. २० जूनला राकेशने १० लाखाची रक्कम बँकखात्यावर ट्रान्स्फर केली. त्यानंतर घरविक्रीचं अनोंदणीकृत करारनामा करण्यात आला. राकेशने बँकेने ४ कोटी ११ लाख रुपये कर्ज मंजूर केल्याचे सांगितले. काही रक्कम कमी असल्याने व्यवहार रद्द करा असा सूर तक्रारदाराने काढला. त्यावेळी उर्वरित रक्कम दिल्यानंतर ही रक्कम मिळताच कॅन्सलेशन डिड करण्याचे सांगितले. तक्रारदाराने विश्वास ठेवून नऊ ब्लॅक चेक घेतले आणि राकेश चक्रवती याला दिले. यावेळी दलाली म्हणून पप्पूला ८ लाख ८० हजाराचे तीन धनादेश दिले. बँकेत ४ कोटी पाच लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम जमा होताच राकेशने मारबलेक्स सिटी इन्फ्राचे अब्दुल्ला खान उर्फ पप्पू, विदेही डायकेम, प्रकाश हिराराम, वैदेही सहकारी पेठ, राकेश चक्रवर्ती यांचे श्री साई सी फूड्स, हार्दिक नितीन गोठी, नरेंद्र अगरवाल, खाते क्रमांक ००२००००२४९४३५ आणि चामुंडा इंटरप्राईझेस या नऊ बँक खात्यात चार कोटी पाच लाख रुपये वळविण्यात आले आणि तक्रारदार असलेल्या घरमालकाला गंडा घालण्यात आला. तक्रारदाराने या व्यवहारानंतर राकेशला फोन करून फ्लॅटचे कागदपत्र मागितले. तेव्हा सर्व कागदपत्र पैसे परत केल्यानंतर घेऊन येतो असे सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई