शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराचे तुकडे केले अन् मैत्रिणीच्या घरात...; महिलेचा कांड, ३ राज्यातील पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 14:19 IST

उत्तर प्रदेशात प्रियकरापासून सुटका करण्यासाठी पती आणि पत्नीनं रचला प्लॅन, ३ राज्यातील पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक 

प्रतापगड - उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे महिलेनं असा कांड केला ज्यामुळे ३ राज्यातील पोलीस हैराण झाली आहे. या महिलेनं तिच्या पतीसोबत मिळून प्रियकराची हत्या केली आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह मैत्रिणीच्या घरी दफन केला. हा मृत बिहारचा राहणारा होता. जेव्हा अनेक दिवसांपासून तो बेपत्ता होता तेव्हा घरच्यांना बिहार पोलिसांकडे याची तक्रार केली. पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली तेव्हा काळीज हादरवणारं हत्याकांड उघडकीस आलं. 

यूपीतील सुवंसा गावातील ही घटना आहे. याठिकाणी राहणाऱ्या विनोद आणि त्याची पत्नी पुष्पा हे हरियाणातील गुरुग्राम येथे खासगी कंपनीत काम करतात. तिथेच पुष्पाचं बिहारच्या शिवनाथसोबत अफेअर सुरू झालं. मात्र पुष्पा काही काळातच शिवनाथला वैतागली. त्याच्यापासून तिला सुटका हवी होती. परंतु शिवनाथ नातं तोडायला तयार नव्हता. ही कहाणी महिलेने तिच्या पतीला सांगितली. त्यानंतर या जोडप्याने एक प्लॅन बनवला. 

एक महिन्याआधी पुष्पा कंपनीतून सुट्टी घेत सुवंसा गावात तिच्या घरी आली. तिने प्रियकर शिवनाथलाही तिथे बोलावले. प्रेयसीच्या बोलण्याने शिवनाथही सुट्टी घेऊन तिला भेटायला पोहचला. परंतु त्याच्यासोबत पुढे काय घडणार आहे याची थोडीशीही कल्पना त्याला नव्हती. पुष्पाने शिवनाथला भेटवण्यासाठी तिची मैत्रिण पूनमलाही घरी बोलावले. तेव्हा घरी पुष्पाचा पती, पूनम आणि तिचा पती चिंतामणीही हजर होता. शिवनाथ जसा आला तसा या सर्वांनी मिळून त्याचा गळा दाबून हत्या केली.

हत्येनंतर शिवनाथच्या मृतदेहाचे ३ तुकडे केले. पूनमच्या घरातच शिवनाथचा मृतदेह दफन केला. त्यानंतर विनोद आणि पुष्पा गुरुग्रामला परतले. दुसरीकडे बिहार पोलीस शिवनाथचा शोध घेत होती. तेव्हा तो पुष्पा नावाच्या महिलेसोबत सतत संपर्कात होता असं समोर आले. शिवनाथचं शेवटचं बोलणं तिच्याशीच झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी पुष्पाला ताब्यात घेत चौकशी केली. खाकीचा धाक दाखवताच तिचा संयम तुटला आणि तिने सर्व कहाणी पोलिसांना सांगितली.

२ आरोपी फरार

पोलिसांनी प्रतापगड येथील पुष्पाची मैत्रिण पूनमच्या घरातून शिवनाथचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तो पोस्टमोर्टमला पाठवला. शिवनाथच्या घरच्यांना त्याच्या मृत्यूची बातमी दिली. त्यासोबत विनोद आणि पुष्पाला पोलिसांनी अटक केली. मात्र पूनम आणि तिचा पती चिंतामणी हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी