शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

नुकताच मुलीचा पहिला वाढदिवस झालेला अन् वडिलांची आत्महत्या; महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने संपवली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 9:34 PM

The girl's first birthday is her father's suicide : सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उमेश दिक्षीवंत हे महावितरणच्या धायरी शाखेत कार्यरत होते.

ठळक मुद्देउमेश प्रकाश दिक्षीवंत  (वय :३२, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे.

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे -धायरी येथील महावितरणच्या कार्यालयात एका वरिष्ठ तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. उमेश प्रकाश दिक्षीवंत  (वय :३२, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, पिंपरी चिंचवड, पुणे) असे आत्महत्या केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे.सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उमेश दिक्षीवंत हे महावितरणच्या धायरी शाखेत कार्यरत होते. सध्या त्यांची रात्रपाळीत ड्युटी असल्याने ते नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री ११ वाजता कामावर हजर झाले होते. नेहमीप्रमाणे इतर कर्मचारी कामात मग्न असताना दिक्षीवंत हे कार्यालयाशेजारी असणाऱ्या गोडावून मध्ये गेले. सकाळी सातच्या दरम्यान एक कर्मचारी गोडाऊनमध्ये काही कामानिमित्त जात असताना त्यांना आतून दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आवाज दिला असता दिक्षीवंत यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या सहकाऱ्याने खिडकीतून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना याबाबत माहिती कळविली. त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांनी छताला असणाऱ्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस अधिक तपास करीत आहेत.मूळचे उस्मानाबाद जिल्हयातील असणारे उमेश दिक्षीवंत हे कोल्हापूरवरून मागील दोन वर्षांपूर्वी बदली होऊन महावितरणच्या धायरी शाखेत रुजू झाले होते.मनमिळावू स्वभावाचे असणारे दिक्षीवंत यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून ते काळेवाडी परिसरात आपल्या पत्नीसमवेत राहत होते. त्यांना एक वर्षाची मुलगी असून तिचा पहिला वाढदिवस नुकताच झाला होता.  दिक्षीवंत यांनी आत्महत्या केल्याने कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. त्यांनी आत्महत्या करण्याइतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसmahavitaranमहावितरण