शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्कार; आतापर्यंत २९ जेरबंद, चार फरार आरोपींचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 12:31 IST

डोंबिवलीतील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. 

डोंबिवली: महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेत शुक्रवारपर्यंत २९ नराधमांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी बाल सुधारगृहात केली आहे, तर चार आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांची चार विशेष पथके त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस अधिकारी सोनाली ढोले यांनी दिली. विविध आठ ठिकाणी नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला.  डोंबिवलीतील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. 

पीडित मुलीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ काढून पुढे वेळोवेळी त्यांच्या मित्रांनीही तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींची घरे, पडक्या चाळी, लॉज अशा ठिकाणांचा यात समावेश आहे. 

गुन्ह्यातील आरोपींचे वकीलपत्र घेऊ नकाडोंबिवलीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र कोणीही वकिलांनी घेऊ नये, असे आवाहन कल्याण जिल्हा फौजदारी न्यायालय वकील संघटनेचे पदाधिकारी ॲड. प्रकाश जगताप यांनी केले आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींचे वकीलपत्र वकील घेतात आणि तो सुटतो. त्यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढते. यात बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्या कमी होण्याऐवजी ती दररोज वाढते. आपण स्वत: समाजातील घटक असल्याने समाजासाठी काहीतरी देणे लागतो. आपण जागृत होण्याची वेळ आलेली आहे, असे मत जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले आहे. दरम्यान, बलात्काराच्या वाढलेल्या घटना पाहता फौजदारी वकील संघटनेच्या सभासदांना सूचना करताना त्यांनी बलात्कारातील आरोपींचे वकीलपत्र महाराष्ट्रातील कोणत्याही वकिलांनीदेखील घेऊ नये, अशी विनंती केली आहे. 

टॅग्स :MolestationविनयभंगthaneठाणेdombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारी