Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 11:39 IST2024-11-05T11:37:32+5:302024-11-05T11:39:27+5:30

गुन्हेगारीच्या घटनांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या उत्तर प्रदेशात शाळेत निघालेल्या एका मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. 

Crime Video: Principal shot dead; The entire incident has been recorded on camera | Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद

Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद

Crime News: शाळेत जात असलेल्या मुख्याध्यापकाची दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुख्याध्यापकावर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. 

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरात मुख्याध्यापकाच्या हत्येने खळबळ उडाली आहे. ज्या मुख्याध्यापकाची हत्या करण्यात आली, ते श्री साई पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत होते, अशी माहिती समोर आली आहे शबाबुल हुसैन असे मयत मुख्याध्यापकाचे नाव आहे. 

मुख्याध्यापक पायी जात होते, हल्लेखोर गाडीवर आले...

मुख्याध्यापक शबाबुल हुसैन यांची हत्या करतानाचा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मुख्याध्यापक हुसैन हे पायी शाळेत निघाले होते. रस्त्यातून जात असताना पाठीमागून दुचाकीवरून दोघे आले. 

मुख्याध्यापक हुसैन यांच्या एकदम जवळ येताच दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका व्यक्तीने पिस्तुल काढले. त्यानंतर लगेच गोळ्या झाडल्या. डोक्यात गोळी लागल्याने ते खाली पडले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 

मुरादाबादमधील मझोला पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. 

Web Title: Crime Video: Principal shot dead; The entire incident has been recorded on camera