शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी झाली 'लॉकडाऊन', राज्यात केवळ बंदी आदेश, सायबर गुन्हेच 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 9:28 PM

२४ मार्चपासून केवळ संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देहत्या, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंगापासून सोनसाखळी चोरीसारख्यापर्यंतच्या  घटनांना आपसुकच आळा बसला आहे. मुंबई, ठाणे, पुणे या महानगरातच नव्हे राज्यभरातील सर्व लहान, मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे.

मुंबई : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सगळे जग हादरून गेले असताना त्याचा एकमेव सकारात्मक परिणाम गुन्हेगारीवर झाला आहे. लॉकडाउन झाल्यापासून राज्यात शरीरासंबंधी  व रस्त्यावरील गुन्हे जवळपास थंडावले आहेत. हत्या, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंगापासून सोनसाखळी चोरीसारख्यापर्यंतच्या  घटनांना आपसुकच आळा बसला आहे. २४ मार्चपासून केवळ संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत. 

पोलीस ठाण्यातील बहुतांश अधिकारी व अंमलदार हे हद्दीत बंदोबस्त व नाकाबंदीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे पोलीस ठाणी ही सुनीसुनी व मोकळी असल्याची परिस्थिती आहे. मुंबई, ठाणे, पुणे या महानगरातच नव्हे राज्यभरातील सर्व लहान, मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. 

कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर जाण्यास मुभा आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. अन्नधान्य, भाजीपाला व मेडिकल्स वगळता सर्व अन्य बाजारपेठा पुर्णपणे बंद असल्याने त्याठिकाणी होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसला आहे. कार्यालये बंद असल्याने रस्त्यावर गर्दी नसल्याने महिला, तरुणीवरील अत्याचार तसेच दागिने, पर्स पळविणे, खिसे कापणे यासारखे प्रकार थांबला आहे.

सध्या ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर व्हायरल करणे, त्यातून बदनामी करणे आदीबाबतच्या गुन्ह्यामध्ये मात्र घडत आहेत. मुंबईतील ९२ पोलीस ठाण्यात एरवी दररोज प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी ५ ते ६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात. लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण पुर्णपणे थांबले आहे.  दाखल झाला तर एखादा अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल होतो, त्याशिवाय आयपीसी १८८ कलमान्वये बंदी आदेश मोडणे आणि सायबरचे गुन्हे मात्र दाखल होत आहेत, अशी कबुली वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

 

कोरोनाच्या प्रतिबंधाला प्राधान्यसमाजात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलीस नेहमीच दक्ष असतात.सध्या राज्यातील कोरोनाच्या  संकटाला हटविणे ,हे आमचे प्राधान्य आहे ,त्याअनुषंगाने कार्यवाही केली जात आहे. लॉकडाउनमुळे नागरिक घरात थांबून असल्याने अन्य गुन्ह्यांच्या घटनांना आपसूक अटकाव बसला आहे.मिलिंद भारंबे ( विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यस्था, पोलीस मुख्यालय )समाजात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलीस नेहमीच दक्ष असतात.सध्या राज्यातील कोरोनाच्या  संकटाला हटविणे ,हे आमचे प्राधान्य आहे ,त्याअनुषंगाने कार्यवाही केली जात आहे .लॉकडाउनमुळे नागरिक घरात थांबून असल्याने अन्य गुन्ह्यांच्या घटनांना आपसूक अटकाव बसला आहे. - मिलिंद भारंबे ( विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यस्था, पोलीस मुख्यालय )

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रcyber crimeसायबर क्राइमcorona virusकोरोना वायरस बातम्या