शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रेमी युगुलाने महिलेचा गळा चिरून केली हत्या, दीड महिन्यानी उलगडलं हत्येचं गूढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 14:33 IST

मृत महिलेचं नाव रत्नाबेन मोहनलाल जैन(७०) असून त्या भांडूप पश्चिममधील फुगावाला कंपाऊंट परिसरात एका चाळीतील घरात राहत होत्या.

मुंबईतील भांडूप परिसरातील एका चाळीमध्ये एकट्या राहणाऱ्या ७० वर्षीय वृद्ध महिलेची दीड महिन्याआधी गळा चिरून हत्या (elderly woman murder by Slitting throat) करण्यात आली होती. मात्र, ही हत्या कोणी केली? याचा काही सुगावा लागत नव्हता. गेल्या दीड महिन्यापासून पोलीस ही केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत होते. आता अखेर दीड महिन्यांनी या हत्येचं गूढ उलगडलं गेलं आहे. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून एका प्रेमी युगुलाला (Couple arrest) अटक केली. महिलेची हत्या झाल्यापासून हे प्रेमी युगुल भांडूप परिसरातून गायब होतं.

मृत महिलेचं नाव रत्नाबेन मोहनलाल जैन(७०) असून त्या भांडूप पश्चिममधील फुगावाला कंपाऊंट परिसरात एका चाळीतील घरात राहत होत्या. १४ एप्रिल रोजी त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेला रत्नाबेन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा आढळून आला. याच महिलेनं याची माहिती शेजारी राहणाऱ्या लोकांना आणि भांडूप पोलिसांना दिली. (हे पण वाचा : अरे देवा! प्रेयसीचा जीव वाचवण्यासाठी प्रियकराने केली आत्महत्या, मनाला चटका लावणारी लव्हस्टोरी)

मृत महिला रत्नाबेन मोहनलाल जैन या सावकारीचा व्यवसाय करत होत्या. त्यामुळे ही हत्या पैशाच्या अथवा चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. याच दिशेने त्यांनी तपास केला असता, या हत्येचे धागेदोरे उत्तर प्रदेशातील एका प्रेमी युगुलापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ही हत्या नियोजित कटाचा भाग असल्याची माहिती भांडूप पोलिसांनी दिली आहे. (हे पण वाचा : अमेरिकेत बसून त्याने रचला पत्नीच्या हत्येचा कट, ट्रकखाली चिरडून केली हत्या; असा झाला खुलासा)

द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, हत्या झाल्यानंतर आरोपींनी महिलेचे साडे तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटले होते. पण घरात सुरक्षित ठिकाणी ठेवलेली तीन लाख रुपयांची रक्कम तशीच होती. दरम्यान पोलिसांनी मृताच्या घरातून एक वही जप्त केली आहे. ज्यामध्ये महिलेनं कोणत्या व्यक्तीला किती रुपये उधार दिलेत याचा हिशोब लिहिलेला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
 

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश