नागा साधूची मारहाण करून हत्या, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 11:22 PM2021-01-23T23:22:07+5:302021-01-23T23:22:58+5:30

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशमधील पिलिभीत जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील दियोरिया कला ठाणे क्षेत्रातील सिंधोरा गावात आज एका नागा साधूची जबर मारहाण करून हत्या करण्यात आली.

Assassination of a Naga sadhu, a shocking incident in Uttar Pradesh | नागा साधूची मारहाण करून हत्या, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

नागा साधूची मारहाण करून हत्या, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

googlenewsNext

पिलिभीत - उत्तर प्रदेशमधील पिलिभीत जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील दियोरिया कला ठाणे क्षेत्रातील सिंधोरा गावात आज एका नागा साधूची जबर मारहाण करून हत्या करण्यात आली. एसपी जयप्रकाश यांनी सांगितले की, दियोरिया पोलिसांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेस या प्रकरणाचा तपास सुरू करण्या आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधोरा गावातील कालव्याच्या शेजारी असलेल्या एका मंदिराच्या परिसरात हे नागा साधू झोपडी बांधून राहत होते. शनिवारी सकाळी या साधूची भाची शेती पाहायला गेली असता तिने या साधूला मृतावस्थेत पाहिले. त्यांनी सांगितले की, पुढील सूचना मिळेपर्यंत पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कायदेशीर कारवाई पूर्ण करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. एसपी जयप्रकाश यांनी पत्रकारांना सांगितले की, दियोरिय पोलिसांनी कुटुंबीयांकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारावर अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींना लवकराल लवकर पकडले जाईल, असे त्यांनी सांगितले.

हत्या झालेल्या नागा साधूचे नाव सोमपाल असून, ते २५ वर्षांपूर्वी नागासाधू बनले होते. त्यांनी निगोही शाखा कालव्याच्या शेजारी छोटे मंदिर बांधले होते. तसेच तिथे ते झोपडी बांधून राहिले होते. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्या हवाल्याने सांगितले की, हे साधू काली मातेचे पुजारी होते आणि आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी दोन कुत्रे पाळले होते. हे कुत्रे नेहमी साधूंजवळ राहत असत.

दरम्यान, मृत साधूचा कुणासोबतही वादविवाद नसल्याचेही समोर आले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री कुटीवर हल्ला केला आणि साधूला मारहाण केली. या मारहाणीदरम्यान डोक्याला जखम झाली. त्यातच या साधूचा मृत्यू झाला. सकाळी या घटनेची माहिती मिळताच या साधूच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

Web Title: Assassination of a Naga sadhu, a shocking incident in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.