Anticipatory bail of Gautam Navlakha, Teltumbde rejected by the High Court | Bhima Koregaon : गौतम नवलखा, तेलतुंबडे यांना हायकोर्टाने दिला दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला
Bhima Koregaon : गौतम नवलखा, तेलतुंबडे यांना हायकोर्टाने दिला दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

ठळक मुद्देमुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला आहे.  गौतम नवलखा व प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल हायकोर्टाने राखून ठेवला होता.

मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मुंबई हायकोर्टानं फेटाळला आहे. मात्र, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला आहे. 

कोरेगाव भीमा हिंसाचार व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा व प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल हायकोर्टाने राखून ठेवला होता. त्याशिवाय या दोघांना सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा, या राज्य सरकारच्या अर्जावरील निर्णयही न्यायालयाने राखून ठेवला होता.



कोरेगाव भीमा हिंसाचार व शहरी नक्षलवाद प्रकरणी पुणे पोलिसांनी नवलखा व तेलतुंबडे यांच्यावर २०१८ ऑगस्टमध्ये गुन्हा नोंदविला. नवलखा यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्यानंतर नवलखा यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज केला. तर तेलतुंबडे यांनी आधीच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
 

Web Title: Anticipatory bail of Gautam Navlakha, Teltumbde rejected by the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.