शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:05 IST

Gujarat Crime News: गुजरातमधील अहमदाबादमध्ये पोलीस एका गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेले. त्यानंतर जे घडलं, त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

शूटर एके ४७ म्हणून सोशल मीडियावर शेखी मिरवणाऱ्या एका गुन्हेगाराचा व्हिडीओ व्हायरल होतोय. अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना बघितल्यानंतर या शूटरची चांगलीच टरकली. इतकी की त्यानंतर मोठं अटक नाट्य घडलं. बहुमजली इमारतीच्या खिडकीतून बाहेर येऊन आरोपीने पोलिसांनी खाली उडी मारण्याची धमकी दिली. पण, आरोपीची काही सुटका झाली नाही. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अहमदाबाद शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक ओढव परिसरातील अभिषेक तोमर उर्फ शूटर एके ४७ या कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यासाठी आले. एका बहुमजली इमारतीत हे अटक नाट्य घडले. पोलिसांना बघून आरोपीची टरकली. अटकेपासून वाचण्यासाठी तो फ्लॅटच्या मागील बाजूस खिडकीतून खाली सज्जावर उतरला.

पोलिसांना म्हणाला उडी मारणार

पोलीस खिडकीपर्यंत पोहोचले. वरच्या बाजूनेही काही पोलीस दोरीच्या साह्याने सज्जावर उतरले. त्यानंतर पोलीस जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. पण, खाली उडी मारण्याची धमकी देऊ लागला. माझ्याजवळ आलात, तर मी खाली उडी मारेन, असे तो पोलिसांना म्हणून लागला. 

पोलिसांनी अशी केली अटक

आरोपीने उडी मारण्याची धमकी दिल्यानंतर पोलीस मागे गेले. त्यानंतर अग्निशामक दलाला बोलवण्यात आले. आरोपीने उडी मारली, तर जीवितहानी होऊन नये म्हणून खाली जाळी लावण्यात आली. त्यानंतर पुन्हा आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. खाली जाळी लावण्यात आलेली असल्याचे पाहून आरोपीकडे धमकी देण्याचा पर्याय राहिला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. 

हे अटक नाट्य सुरू असल्याचे बघून लोकांची गर्दी झाली. अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. 

आरोपीवर अनेक गुन्हे दाखल

अहमदाबाद गुन्हे शाखा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिषेक उर्फ शूटर एके४७ याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा खूप काळापासून शोध सुरू होता. खबऱ्याकडून त्याची माहिती मिळाल्यानंतर ही अटक करण्यात आली.  

आरोपी शिवम हाऊसिंग सोसायटीतील एक्स इमारतीत राहत होता. ५०५नंबरच्या फ्लॅटमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे पोहोचले. पण, आरोपीने दरवाजा आतून बंद करून घेतला होता. त्यानंतर तो किचनमधील खिडकीतून सज्जावर उतरला. तोपर्यंत पोलीस घराचा दरवाजा तोडून आतमध्ये आले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीViral Videoव्हायरल व्हिडिओGujaratगुजरातPoliceपोलिसSocial Viralसोशल व्हायरल