शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

चहा घेण्यासाठी म्हणून गेले आणि तासभर बसवून ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:14 IST

औरंगाबाद : हडको एन-११ मयूरनगर, सुदर्शननगर भागातील पाणीपुरवठा वेळापत्रक कोलमडल्यामुळे गुरुवारी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच पाहणीसाठी आलेल्या मनपा ...

औरंगाबाद : हडको एन-११ मयूरनगर, सुदर्शननगर भागातील पाणीपुरवठा वेळापत्रक कोलमडल्यामुळे गुरुवारी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच पाहणीसाठी आलेल्या मनपा अभियंत्यांना तासभर बसवून ठेवल्याचा प्रकार घडला. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अधिकाऱ्याची सुटका करण्यात आली.

गुळाचा चहा पिण्यासाठी आम्हाला येथे बोलावले होते, आम्हाला कुणीही बसवून ठेवले नाही, अशी सावध प्रतिक्रिया मनपा अभियंत्यांनी दिली. मयूरनगर - सुदर्शननगरात गुरुवारी पाणीपुरवठ्याची वेळ होती. ६ तास उलटूनही नळाला पाणी न आल्याने नागरिक संतापले. पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पद्मे, गिरी, मानकापे यांना नागरिकांनी पाणी येण्यास उशीर का होतोय, याची विचारणा केली. संतापलेल्या नागरिकांनी व्हॉल्व्हजवळच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी - कर्मचारी हजर झाले. या सगळ्या ताफ्याला नागरिकांनी तासभर बसवून ठेवले. यापुढे वेळेवर आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन पद्मे यांनी दिले. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. नागरिकांनी आम्हाला गुळाचा चहा घ्यायला या म्हणून, आग्रह केल्याने सर्वजण याठिकाणी गेल्याचे अभियंत्यांनी सांगितले. रमेश ईधाटे, किरण खरे, कैलास पवार, विजय जाधव आदींचा आंदोलनात सहभाग होता.

-------------

खामनदी पात्राची प्रशासकांकडून पाहणी

औरंगाबाद: महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील खामनदी पात्रातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश गुरूवारी यंत्रणेला दिले. खामनदीची स्वछता व पुनरूज्जीवन मोहीम हाती घेण्यात आली असून, बारापुल्ला गेट येथे सुरू असलेल्या स्वच्छता व इतर कामांची पाहणी करताना तेथील अतिक्रमणांमुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. नदीवरील अतिक्रमणे स्वत: काढून घेण्यासाठी नागरिकांना सूचना करावी, त्यांनी दिलेल्या कालावधीत अतिक्रमणे काढली नाहीत तर जेसीबी लावून ती काढण्याची कारवाई करावी, असे निर्देशही पाण्डेय यांनी दिले.

-----------

मालमत्ताकरासाठी गाळा केला सील

औरंगाबाद: महापालिकेच्या प्रभाग-५ मधील वसुली पथकाने गुरूवारी जाधववाडी नवा मोंढा परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेल हॉल क्रमांक दोन मधील गाळा क्रमांक ३४ सील केला. मालमत्ताधारक सुंदरलाल मुनोतकडे २ लाख २८ हजार १५२ रूपयांचा मालमत्ता कर थकलेला आहे. ही कारवाई पथकप्रमुख मुकुल बांगर, वसुली कर्मचारी रमेश फुले यांनी केली.

---------

७७८२ घरांचे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण

औरंगाबाद: महापालिका आरोग्य विभागाने डेंग्यू प्रतिबंधासाठी गुरुवारी शहरातील सर्व ९ प्रभागांत मलेरिया पथकांनी सर्वेक्षणाची मोहीम राबवली. यात एकूण ७,७८२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. १३० डेंग्यूच्या डास उत्पत्तीची स्थाने आढळल्याने तेथे औषध फवारणी करून ती नष्ट करण्यात आली.