शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

दोन माजी नगराध्यक्षांसह सीईओंविरूद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: June 11, 2014 00:21 IST

परभणी : एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार योजनेचा डीपीआर (डिलिट प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यासाठी शासन निकषापेक्षा ९४ लाख रुपये

परभणी : एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधार योजनेचा डीपीआर (डिलिट प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यासाठी शासन निकषापेक्षा ९४ लाख रुपये अधिक देऊन शासकीय रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी मोंढा पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे़ परभणी ऩ प़ चे तत्कालीन नगराध्यक्ष प्रताप देशमुख, तत्कालीन नगराध्यक्षा जयश्रीताई खोबे, तत्कालीन मुख्याधिकारी बी़ व्ही़ निलावाड, कोंडिबा नरसू कुंभार यांच्याविरूद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे़
या योजनेचा संपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी आर्क असोसिएशन या कंपनीशी तत्कालीन नगराध्यक्ष प्रताप देशमुख व मुख्याधिकारी कोंडिबा नरसू कुंभार यांनी करार केला होता़ या कंपनीचे लक्ष्मीकांत सुर्वे व स्वप्निल श्रॉफ हे दोघे तथाकथित संचालक आहेत़ शासनाच्या नियमानुसार एकूण प्रकल्पाच्या १ टक्का किंवा जास्तीत जास्त ४० लाख रुपये शुल्क अहवाल तयार करण्यासाठी देण्याचे निर्देश आहेत़ हा करार झाल्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये २००९ मध्ये जयश्रीताई खोबे या नगराध्यक्षा झाल्या़ खोबे आणि तत्कालीन मुख्याधिकारी बी़ व्ही़ निलावाड यांनी या कंपनीस शासनाचे निर्देश न पाळता १ कोटी ३४ लाख रुपये म्हणजे ९४ लाख रुपये अधिक दिल्या गेले़
याप्रकरणी विजया मंकय्या कारंगलू यांनी माहिती घेतली आणि अ‍ॅड़ अविनाश चौधरी यांच्यामार्फत परभणी येथील न्यायालयात खटला दाखल झाला़ युक्तिवादानंतर न्यायालयाने संबंधिताविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित केले होते़ त्यानुसार नवा मोंढा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून, चौकशी करून पोलिस न्यायालयास अहवाल सादर करतील़
(प्रतिनिधी)