शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अडीच महिन्यांत ८०० जणांना घेतला चावा

By admin | Updated: July 14, 2014 01:05 IST

संतोष हिरेमठ , औरंगाबाद औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या वसाहतींत मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यांचा उपद्रव वाढत आहे.

संतोष हिरेमठ , औरंगाबादऔरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या वसाहतींत मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यांचा उपद्रव वाढत आहे. रात्री- अपरात्री घराबाहेर जावे लागणाऱ्यांना त्यांची दहशत बसलेली आहे. गेल्या अडीच महिन्यांत जवळपास ८०० जणांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. अचानक हल्ला करून चावा घेत असल्याने शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. या मोकाट दहशतीला पकडण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसते.रस्ते, चौक आणि गल्लीबोळांत व कचऱ्याच्या ठिकाणी त्यांच्या टोळ्या दिसतात. दिवसा या मोकाट कुत्र्यांचा तेवढा त्रास होत नाही. दिवसा न दिसणारी कुत्री रात्री रस्त्यावर येतात. रात्री ही कुत्री पादचारी आणि दुचाकीचालकांवर धावून जातात, प्रसंगी चावतातही. त्यातील अनेक कुत्री दुचाकीचा पाठलाग करतात. वाहनचालकाने वेग वाढवताच ते घसरण्याचे, दुसरे वाहन समोर येऊन अपघात घडले आहेत. रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत या कुत्र्यांना तेथील नागरिक दगड मारून हुसकावून लावतात. काही वेळेतच ही भटक्यांची टोळी पुन्हा तेथे येते. रात्री एकट्या- दुकट्यावर ही मोकाट जनावरे हल्ला करतात.शहराबाहेर सोडतात?शहरात पकडलेली कुत्री सातारा, वाळूज परिसरात सोडण्यात येत असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे अचानक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणे अवघड झाल्याचे नागरिकांनी सांगितले.निर्बीजीकरण शस्त्रक्रियारोज जवळपास २० ते २५ कुत्र्यांना पकडले जाते. त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून नियमानुसार ज्या भागातून त्याला पकडले होते त्याच भागात त्यांना पुन्हा सोडले जाते, असे महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.एस. नाईकवाडे यांनी सांगितले. शहरातील विविध भागांत रात्री खाद्यपदार्थ, मांस विक्रीची दुकाने आणि कचराकुंड्यांपाशी ही कुत्री दिसतात. अन्नासाठी एकमेकांवर ते चालून जातात. त्याचा त्रास तेथील पादचारी व रहिवाशांना होतो. हिंस्र बनलेल्या या श्वानांना हकलण्याची हिंमत कोणाला होत नाही.तात्काळ उपचार करावेतकुत्रा चावल्यावर जखम तात्काळ पाणी आणि साबणाने धुऊन काढावी. जखम नळाच्या किंवा मगच्या धारेखाली धरून स्वच्छ करावी. यामुळे ९० टक्के धोका कमी होतो. डॉक्टरांना तात्काळ दाखवावे, असे शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील (घाटी) मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी सांगितले.घाटी रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्णमहिनारुग्णांची संख्यामे ३५८जून३२२जुलै (१२ पर्यंत)१३०एकूण८१०कुत्र्यांचा उपद्रव वाढलेले रस्तेआकाशवाणी चौक, विष्णूनगर, उत्तमनगर, शहानूरवाडी, पैठणगेट, खोकडपुरा, आविष्कार कॉलनी, जुना मोंढा, चिश्तिया कॉलनी, कॅनॉट गार्डन, शिवाजीनगर, सेव्हन हिल, उल्कानगरी, बेगमपुरा, भारतनगर, चिक लठाणा, रामनगर, सातारा परिसर, कांचनवाडी, वाळूज, पंढरपूर परिसरातील मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्ते.दूरध्वनी क्रमांक बंदमहापालिकेने डॉग स्कॉडचा दूरध्वनी क्रमांक सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिला होता.४या क्रमांकावर ज्या भागातून फोन यायचा त्या भागात व्हॅन पाठविली जायची; परंतु गेल्या काही दिवसांपासून हा क्रमांक बंद आहे. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. रात्री त्रासदायक बनलेल्या या कुत्र्यांची दहशत अनेकदा दिवसाही अनुभवास येते. घरासमोर खेळणाऱ्या मुलांना त्यांनी चावल्याच्या घटना घडल्या आहेत.