शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सराफा बाजारातील उलाढाल दीड कोटींच्या घरात !

By admin | Updated: May 10, 2016 00:02 IST

लातूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो. मात्र दुष्काळामुळे यंदा अनेकांचा सोने खरेदीचा मुहूर्त हुकला आहे.

लातूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा मुहूर्त अतिशय शुभ मानला जातो. मात्र दुष्काळामुळे यंदा अनेकांचा सोने खरेदीचा मुहूर्त हुकला आहे. सोमवारी सोने खरेदीची उलाढाल चक्क ८० टक्क्यांनी घसरली. लातूरच्या सराफा बाजारातील सोने खरेदीची आर्थिक उलाढाल निव्वळ दीड कोटीपर्यंत आली आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार विजयादशमी, गुढी पाडवा, दिवाळी आणि अक्षय तृतीयेनिमित्त सोने खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. सोमवारी अक्षय तृतीयेनिमित्त लातूर शहरातील सराफा बाजारात सोने खरेदीसाठी अपेक्षित गर्दी झाली नसल्याचे, सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, यंदा लग्नसराईचा मौसम आहे. तरीही दुष्काळामुळे सोने खरेदीला प्रतिसाद मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. सराफांच्या तब्बल ४४ दिवसांच्या संपानंतरही अद्यापही म्हणावा तसा सराफा बाजार फुलला नाही. शहरातील सराफा बाजारात तब्बल ३५० च्या वर सराफा दुकाने आहेत. या माध्यमातून १ हजार कारागिरांच्या हाताला काम मिळते. मात्र, दुष्काळामुळे सोमवारी अक्षय तृतीयेचा मुहूर्त असतानाही ग्राहकांची गर्दी झाली नाही. केवळ १ कोटी ५० लाखांच्या घरात सोने खरेदीची उलाढाल झाल्याचे, लातूर जिल्हा सराफ-सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष मोहन जाधव रामेगावकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१० कोटींवर होती उलाढाल...गेल्या चार वर्षापूर्वी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीची आर्थिक उलाढाल १० कोटींच्या घरात गेल्याची नोंद आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून सततच्या नापिकी आणि दुष्काळामुळे यंदा हीच खरेदी चक्क ८० टक्क्यांवर घसरली आहे. सोने खरेदीची २०१४ मध्ये १० कोटींवरुन ५ कोटींवर, २०१५ मध्ये ५ कोटींवरुन ३ कोटींवर आणि २०१६ मध्ये ३ कोटींवरुन १ कोटी ५० लाखांवर उलाढाल घसरल्याने सराफा चिंतेत आहेत.