शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट कारच्या धडकेने हिरावले गरीब कुटुंबातील तीन तरुण; केटरिंग, भाजी विकून घ्यायचे शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:29 IST

सुसाट कार ३० फूट हवेत उडून तरुणांच्या अंगावर पडली; दोन मित्रांचा अंत.

छत्रपती संभाजीनगर: वाहनांच्या अनियंत्रित वेगाने शहरात एकाच वेळी तीन मध्यमवर्गीय कुटुंबांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. हर्सूल आणि न्यू पहाडसिंगपुरा परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत अनिकेत निंबाळकर (२३), मनोज भिलंग (२२) आणि १७ वर्षीय उबेद पठाण या तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे तिघेही तरुण आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षण सांभाळून काम करत होते.

केटरिंगचे काम आटोपून येताना काळाने गाठले
पहिल्या घटनेत, विद्यापीठात शिक्षण घेणारा अनिकेत निंबाळकर आणि त्याचा मित्र मनोज भिलंग हे केटरिंगचे काम आटोपून मध्यरात्री पायी घराकडे निघाले होते. यावेळी मयूर पार्क येथील मंगेश कोलते याच्या कारचा वेग इतका प्रचंड होता की, कार दुभाजकाला धडकून चक्क ३० फूट हवेत उडाली आणि थेट पायी जाणाऱ्या तरुणांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात अनिकेतचा जागीच मृत्यू झाला, तर मनोजने सलग सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी खाजगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. दोघेही केटरिंग काम करून शिक्षण घेत असत. या दोघांच्या निधनाने विद्यापीठ परिसरात शोककळा पसरली आहे. 

भाजी विकून शिकणारा उबेद रक्ताच्या थारोळ्यात
दुसरी घटना हर्सूल गावातच घडली. १७ वर्षांचा उबेद पठाण हा भाजी विकून आपल्या आई-वडिलांना मदत करायचा. गुरुवारी मध्यरात्री काम संपवून घरी जात असताना एका अज्ञात सुसाट वाहनाने त्याला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, उबेद त्या वाहनाखाली अडकून लांबपर्यंत फरफटत गेला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घरातील कमावता मुलगा गेल्याने पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेतकरी कुटुंबातील मुले आणि अपूर्ण स्वप्ने
हे तिन्ही तरुण शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील होते. अनिकेत MSW करत होता, मनोज पदव्युत्तर शिक्षण घेत होता, तर उबेद शाळेत शिकत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने हे तरुण सुटीच्या दिवशी आणि रात्री-अपरात्री काम करायचे. मात्र, कोणाच्या तरी बेजबाबदार वेगामुळे या तिन्ही लेकरांचा आधार कायमचा हिरावला गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे, मात्र गेलेला जीव परत येणार नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Speeding car claims three young lives from poor families.

Web Summary : Tragedy struck Chhatrapati Sambhajinagar as reckless driving claimed three young lives. Aniket, Manoj, and Ubed, all supporting their families through part-time work while studying, were killed in separate accidents. Their dreams, and their families' hopes, were shattered by irresponsible speeding.
टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी