शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज एमआयडीसीत जडवाहनांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:11 IST

वाळूज एमआयडीसीतील एल सेक्टरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा जडवाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील एल सेक्टरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा जडवाहने उभी राहत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या जडवाहनांमुळे इतर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी अपघाताचा धोकाही वाढला आहे.

वाळूज उद्योगनगरीत दररोज मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. औद्योगिक क्षेत्रातील एल सेक्टरमध्ये एका बिअरच्या कंपनीत मालाची ने-आण करणारी जडवाहने रस्त्याच्याकडेला उभी केली जात आहे. या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा ही जडवाहने थांबत असल्यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्यावरच ही वाहने उभी राहत असल्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत.

विशेष म्हणजे दोन-दोन दिवस ही जडवाहने एकाच जागी उभी राहत असल्यामुळे या परिसरात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करणाºया वाहनधारकांकडे एमआयडीसी प्रशासन व वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. कामगार चौकात एमआयडीसीच्या वतीने बीओटी तत्त्वावर वाहनतळ सुरु करण्यात आले आहे.

मात्र या वाहनतळात मूलभूत सुविधाचा अभाव असल्यामुळे वाहनधारक औद्योगिक परिसरात मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात. वाळूज उद्योगनगरीत फोस्टर कंपनीजवळ एमआयडीसी प्रशासनाच्यावतीने मध्यंतरी नवीन वाहनतळ उभारण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, नवीन वाहनतळाचा प्रस्ताव लालफितीत अडकल्यामुळे ठिकठिकाणी जडवाहने रस्त्यावरच थांबत असल्याचे चित्र उद्योगनगरीत पहावयास मिळत आहे.

उद्योजकांच्या तक्रारीकडे दुर्लक्षवाळूज एमआयडीसीतील एल सेक्टर मध्ये असलेल्या युनायटेट ब्रेव्हरेज या कंपनीची जडवाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी जात असल्याचा आरोप या भागातील उद्योजक राजेश मानधनी, रवींद्र कोंडेकर, मनिष धूत आदींनी केला आहे. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन उद्योजकांना आपल्या समस्या मांडत वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी सुरक्षारक्षक नेमण्याची सूचनाही केली होती. मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अप्रिय घटना घडण्याची भितीही या उद्योजकांनी वर्तविली आहे.

टॅग्स :WalujवाळूजTrafficवाहतूक कोंडी