शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

एका महिन्यासाठी ५० कोटींची तरतूद

By admin | Updated: April 27, 2016 00:24 IST

बीड : जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. एप्रिल अखेरपर्यंत ४३ कोटी २ लाख ४४ हजार रुपये छावण्यांवर खर्च झाला असून,

बीड : जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. एप्रिल अखेरपर्यंत ४३ कोटी २ लाख ४४ हजार रुपये छावण्यांवर खर्च झाला असून, पावसाळा सुरू होईपर्यंत आणखी ५० कोटी रुपयांची तरतूद शासनाला करावी लागणार असून, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव बनविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यातील चारा टंचाई लक्षात घेऊन आवश्यक तेथे छावणी हे धोरण राज्य शासनाने अवलंबले व जिल्ह्यात एकूण २७४ छावण्यांना सढळ हाताने मंजुरी दिली. यापैकी आजघडीला प्रत्यक्षात २७० छावण्या सुरू आहेत. २ लाख ७९ हजार ३९७ मोठी, तर २१ हजार १६१ लहान जनावरे या छावण्यांच्या आश्रयाला आहेत.२६ एप्रिलपर्यंत ४३ कोटी २ लाख ४४ हजार रुपये जनावरांच्या चारा-पाण्यावर खर्च झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून एक ते दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. आताच जिल्ह्यात जनावरांसाठी ओला चारा मिळत नाही. बहुतांश छावण्यांना जिल्ह्याबाहेरून चारा येत आहे. चारा वाहून आणण्याचे अंतर २०० पेक्षा अधिक किलोमीटर आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला नाही तर हेच अंतर ५०० कि.मी.पर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.७ जून रोजी जरी पावसाने सुरुवात केली तरी पुढे १५ दिवस चारा उगवण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पाऊस पडताच छावण्या बंद करता येणार नाहीत. यामुळे आगामी काळात चारा-पाण्यासाठी ५० कोटींवर तरतूद करावी लागणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून ५० कोटी रुपयांच्या मागणीचा अहवाल तयार केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)