शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात १ फेब्रुवारीपासून नवीन कंपनी कचरा उचलणार; सध्या सर्वेक्षण सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 17:31 IST

कचरा संकलन करणाऱ्या कंपनीकडून सर्वेक्षण सुरू, १ फेब्रुवारीला होणार कामाला सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : कचऱ्याचे संकलन करण्यासाठी अहमदाबाद येथील वेस्टर्न इमेजनरी या कंपनीची मनपाने निवड केली असून, कंपनीला कामाची वर्कऑर्डर सुद्धा देण्यात आली. कंपनीचे काम १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, त्यापूर्वी सर्वेक्षणासाठी १०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले. घंटागाडीचे मार्ग, नागरी वसाहती, व्यापारी परिसर, कचरा संकलन केंद्र आदी गोष्टींचा अभ्यास कंपनीने सुरू केला आहे.

पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला शहरातील कचरा संकलनात अपयश आले. दरमहा कंपनीला ३ कोटींहून अधिक रक्कम देऊनही शहर स्वच्छ होत नाही. त्यामुळे देशात सर्वाधिक स्वच्छ असलेल्या दहा शहरांमध्ये काम करणाऱ्या कंपनीला कचरा संकलनाचे काम देण्याचा निर्णय मनपाने घेतला. त्यासाठी निविदा काढली. या प्रक्रियेत अहमदाबाद येथील वेस्टर्न इमेजनरी या कंपनीची निवड केली. कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आल्याची माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कंपनीने शहरात सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. सर्वेक्षणासाठी शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. घंटागाडी चारही बाजूंनी बंद राहील. मोठे कंटेनरही अत्याधुनिक आणि चारही बाजूंनी बंद राहतील. याची डिझाईन अद्याप निश्चित केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

३८० घंटागाड्या
नवीन कंपनीला दोन ते तीन शिफ्टमध्ये काम करावे लागेल. घंटागाडीच्या जेवढ्या फेऱ्या होतील, त्यावर बिल दिले जाणार आहे. कंपनीला सुरुवातीला ३८० घंटागाड्या नवीन आणाव्यात, असे सांगण्यात आले. एका घंटागाडीत १२०० किलो कचऱ्याची वाहतूक करण्यात येणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करणे हे कंपनीला बंधनकारक करण्यात आले आहे. या कंपनीच्या घंटा गाडीत मिश्र कचरा आढळून आल्यास दंडाची तरतूद करारामध्ये आहे.

कंपनीकडून अभ्यास सुरू
कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, त्याची पूर्व तयारी करण्यासाठी कंपनीने सर्वेक्षण हाती घेतले आहे. सर्वेक्षणात वसाहती, वॉर्ड, निवासी मालमत्ता, व्यावसायिक मालमत्ता, रोज निघणारा कचरा, सणासुदीच्या काळात निघणारा कचरा, कचऱ्यात भविष्यात होऊ शकणारी वाढ आदींचा अंदाज घेतला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : New Company to Collect Garbage in Chhatrapati Sambhajinagar from February

Web Summary : A new company, Western Imaginary, will handle Chhatrapati Sambhajinagar's garbage collection starting February 1st. Replacing a previous contractor, the company is currently surveying the city with 100 employees, planning routes and assessing waste generation to improve cleanliness with modern equipment.
टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका