शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

एकाच भूवैज्ञानिकावर भार

By admin | Updated: February 17, 2016 00:33 IST

गजानन वानखडे , जालना गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत असतानाच जिल्ह्यातील भू जल पातळीची पाहणी करणाऱ्या भू वैज्ञानिकांची दोन पदे दीड वर्षापासून रिक्त

गजानन वानखडे , जालनागेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत असतानाच जिल्ह्यातील भू जल पातळीची पाहणी करणाऱ्या भू वैज्ञानिकांची दोन पदे दीड वर्षापासून रिक्त असल्याने जिल्ह्यातील अनेक भागात समस्या गंभीर झाली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. आगामी काळात दुष्काळाची दाहकता अधिक होणार असून, प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. जिल्ह्यात सलग चार वर्षांपासून आठही तालुक्याला पाणीटंचाईचे चटके बसत आहे. जिल्ह्यातील भूगर्भात जलपातळीची काय स्थिती आहे हे महत्वाचे काम या विभागाकडे आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वरिष्ठ एक भूजलवैज्ञानिक आणि दोन कनिष्ठ वैज्ञानिकांची पदे मंजूर आहेत. त्यांनी दिलेल्या अहवालावरच ग्रामीण भागात पाणीटंचाई नियोजनाचे काम केले जाते. परंतु एक वर्षापेक्षा जास्त काळापासून ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वरिष्ठ भूवैज्ञानिकाचे आणि कनिष्ठ वैज्ञानिकांची पदे रिक्त आहेत. ज्यांच्या अहवालावरच जिल्ह्यातील कोणत्याही नवीन पाणीपुरवठा योजना, विंधनविहिरींची दुरूस्ती, खोलीकरण, एमआरजीएसच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विहिरी कूपनलिकांसाठी वरिष्ठ भू वैज्ञानिकांचे प्रमाणपत्र गरजेचे असते. परंतु भू वैज्ञानिकांचे पद रिक्त असल्याने प्रभारी कनिष्ठ भूवैज्ञानिकावर या विभागाचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यातील ९७२ गावांतील भूजल स्थिती जाणून घेण्यासाठी एका वैज्ञानिकाला प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नाही. परिणामी पाहणी न करताच अनेक अहवाल देण्यात आल्याचे समोर आले आहे.अनेक तालुक्यांत होत असलेल्या कामांचे अहवाल चुकीचे जात आहेत. विशेष म्हणजे भूवैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालावरच जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग काम करत असल्याने शासनाच्या लाखो रूपयांचा चुराडा होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री पद जिल्ह्याला मिळाले आहे. परंतु त्याच जिह्यात भू वैज्ञानिकांचे पदे रिक्त कसे काय असा सवाल ग्रामीण भागातील जनतेतून उपस्थित केला जात आहे.