शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातच्या भामट्यांचा ऑनलाईन फंडा; स्क्रॅप व्यापाऱ्याला लावला १९ लाखाचा चुना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 19:36 IST

३० डिसेंबर रोजी रहीम सोबत झालेल्या सौद्यात ३० रुपये ४० पैसे प्रति किलो प्रमाणे भंगार खरेदी करण्याचे ठरले.

ठळक मुद्दे भंगार माल विक्री करण्याचे आमिष दाखवून १९ लाख ४२ हजाराची फसवणूक

औरंगाबाद: स्वस्त दराने ३०० टन भंगारमाल विक्री करण्याचे आमिष दाखवून औरंगाबादेतील स्क्रॅप व्यापाऱ्याला गुजरातच्या पाच भामट्यांनी १९ लाख ४१ हजार ९५२ रुपयांचा गंडा घातला. व्यापाराने जिन्सी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री तक्रार नोंदविली.

मिश्रा, रहीम, नदीम, रमजान उर्फ रुस्तुम आणि राजा पठाण अशी आरोपींची नावे आहेत. जिन्सी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मजहर खान हारुण खान (रा. सिल्क मिल कॉलनी) हे अरिफ शागिर पटेल यांच्यासोबत भागीदारीमध्ये भंगार खरेदी विक्रीचा धंदा करतात. आझाद चौकात सुप्रीम ट्रेड नावाचे त्यांचे कार्यालय आहे. २५ डिसेंबर २०२० रोजी अझहर खान हे त्यांच्या कार्यालयात बसले असताना रहीम नावाच्या अनोळखी व्यक्तीने त्यांना कॉल केला आणि त्यांच्याकडे ३०० टन भंगार ३६ रुपये प्रति किलो दराने विक्रीसाठी असल्याचे सांगितले. 

३० डिसेंबर रोजी रहीम सोबत झालेल्या सौद्यात ३० रुपये ४० पैसे प्रति किलो प्रमाणे भंगार खरेदी करण्याचे ठरले. यानंतर रहिमच्या सांगण्याप्रमाणे मिश्रा यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्याने भंगारमाल अनावल (ता. चिखली, वापी, गुजरात) येथे असल्याचे आणि दयालाल मेहता अँड स्टील या नावाच्या बँक खात्यात (सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा मुंबई) पैसे जमा करण्यास सांगितले. यानंतर त्याने नदीमचा मोबाईल क्रमांक देऊन तो तुम्हाला माल दाखवेल असे सांगितले. जुबेर शेख यांनी नदीमसोबत गुजरातला जाऊन मालाची खात्री केली. ७ जानेवारी रोजी तक्रारदार यांनी गुजरातमधून भंगार आणण्यासाठी दोन ट्रक पाठवले. यावेळी मिश्राने त्याच्यासोबत रमजान उर्फ रुस्तुम, राजा पठाण यांना दिले.

ई चलन न देता केले मोबाईल बंद२ ट्रकमध्ये सुमारे ६३ टन ८८० किलो भंगार भरल्यानंतर आरोपींनी तक्रारदार यांच्या व्हाॅट्सॲपवर ७ लाख ५५ हजार ५३६ रुपये आणि ११ लाख ८८ हजार २१० रुपयांची दोन बिले पाठवली. शागीर यांनी लगेच आरटीजीएस करून आरोपीच्या बँक खात्यात १९ लाख ४१ हजार ९५२ रुपये ऑनलाइन वर्ग केले. तक्रारदाराने दोन्ही ट्रकचे ई चलन मागितले असता त्यांनी ई चलन न देता मोबाईल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मझहर यांनी जिन्सी ठाण्यात धाव घेतली. फौजदार विजय जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजी