शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता प्रश्नात प्रशासन-पदाधिकारी हतबल

By admin | Updated: June 15, 2017 23:41 IST

नांदेड: शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व अस्वच्छता संकटात महापालिका पदाधिकाऱ्यांसह प्रशासनही हतबल ठरले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व अस्वच्छता संकटात महापालिका पदाधिकाऱ्यांसह प्रशासनही हतबल ठरले आहे़ पदाधिकारी प्रशासनाकडे तर विरोधक सत्ताधाऱ्यांकडे स्वच्छता प्रश्नी बोट दाखवून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत़ याचा फटका मात्र सर्वसामान्य शहरवासियांना बसत असून शहरापुढे रोगराईचे मोठे संकट आ वासून पुढे उभे आहे़स्वच्छतेची कोणतीही पर्यायी व्यवस्था न करताच एटूझेडला ३१ मार्च रोजी नांदेडमधून कार्यमुक्त करण्यात आले़ तत्कालीन आयुक्त समीर उन्हाळे यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेच्या ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची रवानगी ही स्वच्छता मजूर या मूळ पदावर केली होती़ मात्र यातील किती कर्मचारी मूळ पदावर गेले हे स्वच्छता विभाग आजपर्यंतही ठामपणे सांगू शकला नाही़ बहुतांश कर्मचाऱ्यांनी राजकीय व प्रशासकीय दबावातून आपली मूळ नियुक्ती स्वीकारलीच नाही़स्वच्छता विभागाने यावर तोडगा म्हणून कंत्राटी मजूर घेतले खरे मात्र त्यातही कागदावरील मजुरांची संख्याच अधिक आहे़ त्यामुळे कागदावर झालेली स्वच्छतेची कामे प्रत्यक्षात झालीच नाहीत़ महापालिकेत स्वच्छता देयकांमध्ये प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाला मिळाल्याने त्यावर ‘ब्र’ काढण्यास कुणीही तयार नाही़ पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर रस्त्यावरील घाण घरात शिरल्यानंतर मात्र विरोधकांनी आम्ही काही तरी करीत आहोत हे दाखविण्याचा १२ जून रोजी प्रयत्न केला़ त्यात सत्ताधाऱ्यांनीही त्याच पद्धतीचा अवलंब करीत आम्हीही मागे नसल्याचे दाखवून दिले़ त्यात कचरा उचलण्यासाठी भाड्याने घेतलेले ट्रॅक्टर चोरीचे असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महापालिकेचे स्वच्छता काम करणारे ट्रॅक्टर जप्त केले़ हे प्रकरण १३ जूनपर्यंत चालले़ नूतन आयुक्त गणेश देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर आधी स्वच्छता अशी भूमिका घेत कामाला सुरूवात केली़ त्यात १३ जून रोजी प्रादेशिक परिवहन विभागाशी चर्चा करून ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर सोडविले़ त्यानंतर आता रात्रपाळीत काम करून कचऱ्याचे ढिगारे उचलण्याचे आदेश दिले़ त्यामुळे येत्या दोन - तीन दिवसांत हा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास आयुक्त देशमुख यांनी व्यक्त केला़