युती तोडा, स्वबळावर लढा! छ. संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांनी अतुल सावेंची गाडी अडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:24 IST2026-01-20T18:22:25+5:302026-01-20T18:24:52+5:30

Chhatrapati Sambhajinagar ZP Election: भाजप- शिंदेसेनेची युती जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांची नाराजगी; युती तोडण्यासाठी मंत्र्यांवर टाकला दबाव

Chhatrapati Sambhajinagar ZP Election: Break the alliance, fight on your own! BJP workers stopped Atul Save's car in Chhatrapati Sambhajinagar | युती तोडा, स्वबळावर लढा! छ. संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांनी अतुल सावेंची गाडी अडवली

युती तोडा, स्वबळावर लढा! छ. संभाजीनगरात भाजप कार्यकर्त्यांनी अतुल सावेंची गाडी अडवली

छत्रपती संभाजीनगर: जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीमधील 'जागावाटपा'वरून सुरू असलेला संघर्ष आता रस्त्यावर आला आहे. महायुतीची घोषणा झाल्यानंतर काही भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री अतुल सावे यांची गाडी रोखून धरत 'युती तोडा' अशा जोरदार घोषणा दिल्या. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करूनही आपली हक्काची जागा मित्रपक्षाला (शिंदेसेना) सोडल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला असून, या प्रकारामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे वादाचे कारण? 
जिल्हा परिषदेसाठी सिल्लोड वगळून भाजप २७ आणि शिंदेसेना २५ जागांवर लढणार असल्याची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी या गणिताला विरोध दर्शवला आहे. भाजप 'मोठा भाऊ' असूनही अनेक ठिकाणी सक्षम उमेदवारांना डावलले गेल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. "आम्ही अनेक वर्षे पक्षाची संघटना बांधली, पण आता जागा दुसऱ्याला सोडल्याने आमचे अस्तित्व काय?" असा सवाल कार्यकर्त्यांनी मंत्री सावे यांच्यासमोर उपस्थित केला.

इच्छुकांची गर्दी आणि नाराजीचे सत्र 
महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. "महापालिकेत जसा चमत्कार घडवला, तसा जिल्हा परिषदेतही स्वबळावर निवडून येण्याची आमची ताकद आहे, मग युतीचे ओझे कशाला?" असा सूर कार्यकर्त्यांमध्ये आहे. मनपा निवडणुकीच्या वेळीही तिकीट न मिळाल्याने भाजपत मोठा राडा झाला होता, त्या अनुभवावरून आता कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत.

वातावरण तापले 
मंत्री अतुल सावे कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असले तरी कार्यकर्ते अधिक आक्रमक आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्या या पवित्र्यामुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली असून, छत्रपती संभाजीनगरचे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

Web Title : गठबंधन तोड़ो, अकेले लड़ो! भाजपा कार्यकर्ताओं ने मंत्री की गाड़ी रोकी।

Web Summary : संभाजीनगर में भाजपा कार्यकर्ताओं ने शिंदे सेना के साथ गठबंधन का विरोध किया, जिला परिषद चुनावों में स्वतंत्र रूप से लड़ने की मांग की। उन्होंने मंत्री अतुल सावे की गाड़ी रोकी, गठबंधन सहयोगी के पक्ष में सीट आवंटन पर गुस्सा व्यक्त किया, जिससे राजनीतिक उथल-पुथल मच गई।

Web Title : Break alliance, fight alone! BJP workers stop minister's car.

Web Summary : BJP workers in Sambhajinagar protested against the alliance with Shinde's Sena, demanding to contest independently in the Zilla Parishad elections. They blocked Minister Atul Save's car, expressing anger over seat allocation favoring the alliance partner, sparking political turmoil.