शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य करा

By admin | Updated: September 29, 2016 00:58 IST

केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण जाहीर केले. परंतु शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात आजही मोठ्या अडचणी आहेत.

बाबासाहेब वासाडे : विविध कार्यकारी सहकारी संस्था संचालकांचा सत्कारचंद्रपूर : केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण जाहीर केले. परंतु शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यात आजही मोठ्या अडचणी आहेत. विविध कार्यकारी संस्थांनी आता शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे. सुदैवाने आपल्या परिसरात आता सिंचनाची सोय झाली असून पतपुरवठा सुरू झाला तर त्यांचा विकास कुणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नवनियुक्त संचालकांनी शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्य करावे, असे आवाहन सहकारी व शिक्षण महर्षी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी केले.ते कृषी जीवन विकास प्रतिष्ठानच्या वतीने बल्लारपूर इंस्टिट्युट आॅफ टेक्नालॉजी येथे आयोजित विविध कार्यकारी सहकारी संस्था कोठारीच्या नवनियुक्त संचालकांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी वरिष्ठ नेते डॉ. देवानंद गुरू, संस्थेचे सचिव विजय वासाडे, जि.प. सदस्य चंद्रकांत गुरू, प्राचार्य वासुदेव कांबळे यांची उपस्थिती होती. अ‍ॅड. वासाडे म्हणाले, काही महिन्यांपूर्वी इस्त्राईल येथे जाऊन डॉ. माही व कृ.जि.वि. प्रतिष्ठानचे संचालक प्रशांत वासाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासोबत तेथील आधुनिक शेतीचा अभ्यास केला. त्या आधारावर बल्लारपूर, पोंभूर्णा, गोंडपिपरी व राजुरा येथील शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली. इस्त्राईल तत्वावर शेतकरी शेती करण्यास तयार असला तरी त्याला तंत्रज्ञान मिळवून देणे, पाणी देणे, पतपुरवठा करणे काळाची गरज आहे. सुदैवाने पळसागाव, आमडी उपसा सिंचन योजना ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून पूर्ण झाली. पाईप लाईनचा वापर सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे आता नुकसान होणार नाही. असे असले तरी इस्त्राईलच्या धरतीवर शेती करण्यासाठी तयार असलेल्या पाच हजार शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. उपसा योजना पूर्ण झाल्याने पळसगाव, आमडी, कळमना, कोर्टी, दहेली व बामनी या गावातील सहा हजार एकराला सिंचनाची सोय होणार आहे. या शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अ‍ॅड. वासाडे यांनी चंद्रकांत गुरू यांचे कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)