शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वाघापासून बचावासाठी ‘गाव बचाव मोहीम’

By admin | Updated: July 8, 2014 23:24 IST

मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही वाघांना रोखणे कठीण झाले आहे. मात्र आता वनविभागाकडून हिमाचल प्रदेशातील वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ डॉ. रुद्र यांच्या मार्गदर्शनाखाली

आवळगाव : मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही वाघांना रोखणे कठीण झाले आहे. मात्र आता वनविभागाकडून हिमाचल प्रदेशातील वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ डॉ. रुद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बस्ती बचाव मोहीम’ राबविण्यात येत आहे. अशीच मोहिम ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे राबवून शेतकऱ्यांना व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे करुन प्रशिक्षण देण्यात आले.दक्षिण ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत येत असलेल्या हळदा येथे सध्या वाघांची दहशत आहे. मानवी वस्तीवर वाघांचे आक्रमण होत असून त्यामध्ये मनुष्याहानी होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र वनविभागाकडे वाघांच्या आक्रमणातून मानवाच्या बचावासाठी ठोस उपाययोजना नसल्याने वनविभागाने याबाबत डॉ. रुद्र यांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती बचाव मोहिम राबविण्याचे निश्चित केले. या मोहिमेद्वारे वाघांना व वन्यप्राण्यांना मानवी वस्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी विशेषत: स्थानिक नागरिकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात घ्यावे लागते. त्या दृष्टीने हळदा येथे नुकतेच मार्गदर्शन देण्यात आले. हळदा येथील नागरिकांनी वाघांपासून बचावासाठी व शेतपिकाची हानी रोखण्यासाठी बस्ती बचाव मोहिमेला सहकार्य करण्याचे ठरविले आहे. सध्या हळदा परिसरात वाघांचे वास्तव्य असून मागील महिन्यात वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाला होता. याच परिसरात दोघांना गंभीर जखमी केले होते. आजवर अनेक पाळीव प्राण्यांना वाघाने ठार मारले. या घटनांमुळे हळदा गावासह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. येथील लोकांनी वनविभागाला टार्गेट करुन आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, ही बाब लक्षात घेऊन वनविभागाने डॉ. रुद्र यांना पाचारण करुन त्यांच्या माध्यमातून येथील नागरिकांना प्रशिक्षण दिले. यावेळी सहाय्यक उपवन संरक्षक, मेश्राम, वनक्षेत्र अधिकारी- पत्रे, वैरागडे, खोब्रागडे व सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी (दक्षिण उत्तर) वनविभागाचे कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)