शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या प्रलंबित समस्या १० फेबुवारीपर्यंत सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

प्रलंबित समस्या १० फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित विभागातील समस्या तात्काळ दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी दिले आश्वासन: विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग व आश्रम शाळांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शनिवार घेराव आंदोलन केले. एकाच दिवशी प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग व समाज कल्याण अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या विभागातील कारभारामुळे अनेक पीडित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी त्रस्त आहेत. त्यांच्या प्रलंबित समस्या १० फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित विभागातील समस्या तात्काळ दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेला न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्राथमिक शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग व आदिवासी शाळा संदर्भातील समस्या दूर करण्यासाठी समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. तिन्ही विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्या विभागातील समस्या निकाली काढण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सदर आंदोलन प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात प्रांतिय उपाध्यक्ष एम. डी. धनरे, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कोषाध्यक्ष दिगांबर कूरेकर, सल्लागार देवराव निब्रड, प्रमोद कोंडलकर, संघटक मनोज वासाडे, आश्रम शाळा विभागाचे पदाधिकारी दिलीप गोखरे, किशोर नगराळे, सुरेंद्र अडबाले, राजु डाहूले, रवि बनपूरकर, प्रभाकर शेरकी, विठोबा हिंगाणे, भालचंद्र धांडे, पंकज बाराहाते सर्व अतिरिक्त शिक्षक व उपस्थित इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. प्रलंबित समस्या व मागण्यांमध्ये आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात येईल. सातव्या आयोगात एकस्तर योजना मंजूर करणेबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवण्यात यईल, असेही आश्वासनही देण्यात आले.या आहेत मागण्या१२ वर्ष सेवा झालेल्या आश्रमशाळा शिक्षकांना वरिष्ठ श्रेणीचा लाभ तात्काळ मंजूर करण्यात येईल, १ तारखेस वेतन न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, चुकीच्या वेतननिश्चिता सुधारित करून मंजूर करण्यात येईल. २०१३ च्या परिपत्रकानुसार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वरीष्ठ श्रेणीचा लाभ देण्यात येईल. भविष्य निर्वाह निधी प्रस्ताव विनाविलंब मंजूर करण्यात येईल, या सर्व मागण्या तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दिले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या आंदोलनामुळे पीडित कर्मचाºयांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक