शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 :  पश्चिम विदर्भात खडसे समर्थकांचा बंडाचा झेंडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:13 IST

संतप्त झालेल्या समर्थकांनी बुलडाणा जिल्ह्यातील विविध मतदारसंघासह पश्चिम विदर्भातील काही मतदारसंघात बंडांचा निर्धार केल्याचे दिसून येते.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ज्येष्ठ नेते आणि बुलडाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री एकनाथ खडसे यांची भारतीय जनता पक्षाकडून कोंडी केली जात आहे. भाजपच्या तिसऱ्या-चौथ्या यादीतही खडसेंना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी बुलडाणा जिल्ह्यातील विविध मतदारसंघासह पश्चिम विदर्भातील काही मतदारसंघात बंडांचा निर्धार केल्याचे दिसून येते.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १३९ जणांची दुसरी यादी जाहीर केली. त्यानंतर गुरूवारी पुन्हा तिसरी यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चौथी यादीही जाहीर झाली. मात्र, यादीत एकनाथराव खडसे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे. त्यामुळे आता खडसे यांचा पत्ता भाजपने कट केला का? अशी जोरदार चर्चा सुरु झाली असतानाच, जळगाव खांदेश जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे समर्थकांच्या भावनांचा उद्रेक झाला. एका खडसे समर्थकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, अनेकांच्या भावनांचा उद्रेक झाल्याने विद्रोहाची सुप्त लाट दिसून येते.भाजपच्या या षडयंत्राविरोधात आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थनार्थ अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दांडग्या जनसंपर्कामुळे एकनाथ खडसे यांची जिल्ह्यातील मतदारसंघात चांगली पकड आहे.

खडसे समर्थक आक्रमक!राज्यात माजी खडसे यांचे समर्थक कमालिचे आक्रमक झाले आहेत. ‘तुम्ही अपक्ष लढाच’, असा आग्रह समर्थकांनी सुरू केला आहे. त्याचवेळी खामगाव विधानसभा मतदारसंघातून माधव पाटील निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्याचवेळी बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून योगेंद्र गोडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. बाळापूर मतदार संघातून अच्यूतराव पाटील रिंगणात असल्याची चर्चा आहे.

कोण आहेत माधव पाटील?माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामी प्रकरणात सर्वाधिक तक्रारी दाखल करण्यात माधव पाटील यांनी महत्वाची भूमिका अदा केली होती. त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये अंजली दमानिया यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता.

भारतीय जनता पक्षाला जनमाणसांत रूजविण्यासाठी नाथाभाऊंचे योगदान मोठे आहे. त्यांची पक्षाकडून अवहेलना केली जात आहे. नाथाभाऊंच्या समर्थनार्थ माझ्यासह अनेक समर्थकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.- माधव पाटीलमाजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेkhamgaonखामगावMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा