शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

रेती व वीटभट्टी व्यावसायिकांवर कारवाई

By admin | Updated: March 27, 2015 01:37 IST

संग्रामपूर तालुक्यातील कारवाई;३ लाख ३४ हजारांचा दंड.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : विनापरवाना रेती वाहतूक व अवैध वीटभट्टय़ा व्यवसाय करणार्‍यांना ३ लाख ३४ हजार रुपये दंड करण्यात आल्याची धडक कारवाई संग्रामपूरचे तहसीलदार डॉ. सचिन खल्ल्याळ यांनी २६ मार्च रोजी केली. तालुक्यात मोठय़ा प्रमाणात विनापरवाना रेतीचे उत्खनन होत असल्याने तसेच अवैध वीटभट्टय़ा चालत असल्याने शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत आहे. तसेच वीटभट्टय़ांवर चिमण्या नसल्याकारणाने प्रदूषणसुद्धा होत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी धनंजय गोगटे यांच्या निर्देशानुसार वीटभट्टय़ाचा सर्व्हे करण्यात आला असताना सदर मालकाकडे परवाना नसल्याकारणाने १७ वीटभट्टी मालकांना २ लाख ५५ हजार रुपये दंड करण्यात आला. यामध्ये सोनाळा महसूल मंडळातील ५ जणांविरुद्ध, पातुर्डा मंडळातील ४, कवठळ मंडळातील १ तसेच बावनबीर मंडळातील ७ जणांकडून हा दंड वसूल करण्यात आला. तसेच वाण व पूर्णा नदीपात्रात हर्रास न झालेल्या घाटातून मोठय़ा प्रमाणात होत असलेली रेतीची तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार सचिन खल्ल्याळ यांनी रात्रभर जागे राहून मिशन राबविले. यात सात वाहनधारकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ८0 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रत्येकी १0 हजार २५0 रुपये प्रमाणे दंडाची वसुली करण्यात आल्याचे तहसीलदार खल्ल्याळ यांनी सांगितले. या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे. विनापरवाना रेती वाहतूक रोखण्यासाठी काही वाहनांची आरटीओ नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहितीसुद्धा तहसील कार्यालयातून देण्यात आली.