शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेत येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

भंडारा शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असून नागरिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता नगरपरिषदेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देआढावा बैठक : कन्टेन्मेंट झोनवर विशेष लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव बघता भंडारा नगरपरिषदेत येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या नगरपरिषदेच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. शहरातील कन्टेन्मेंट झोनवर विशेष लक्ष देण्याची सूचनाही या बैठकीत करण्यात आली.
भंडारा शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असून नागरिकांचे आणि कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेता नगरपरिषदेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला नगराध्यक्ष खासदार सुनील मेंढे, उपाध्यक्ष दिनेश भुरे, सभापती आशू गोंडाणे, नगरसेवक रुबी चढ्ढा, कैलाश तांडेकर, बंटी मिश्रा, मंगेश वंजारी, मनोज बोरकर, पप्पू भोपे, अजीज शेख आणि मुख्याधिकारी विनोद जाधव उपस्थित होते.
शहरातील कन्टेन्मेंट झोनवर विशेष लक्ष देऊन तो परिसर दैनंदिन निर्जंतूकीकरण करण्याचे निर्देश या बैठकीत करण्यात आले. तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दंड आणि गर्दी होणाऱ्या ठिकाणी संबंधितांवर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. पावसाची शक्यता गृहीत धरून नाले सफाई आणि पाणी साचून राहण्याच्या समस्येच्या दृष्टीने प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवकांच्या सहकार्यातून पाहणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. शहरातील भाजी मंडईचा परिसर निर्जंतूकीकरण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

नियमांचे उल्लंघन, दंड वसूल
शहरातील सर्व दुकाने आठवड्यातून एक दिवस मंगळवारी बंद ठेवण्याचे आदेश आहेत. परंतु नगरपरिषदेच्या पथकाने तपासणी केली असता मोठ्या बाजारातील संस्कृती साडी सेंटर उघडे दिसले. त्यामुळे त्या दुकानदारावर पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला. तर बाजारात फिजीकल डिस्टन्सिंग न राखणाऱ्यांकडून दीड हजार रुपये दंड आकारण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावणे, वेळेवर दुकान बंद न करणे आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याप्रकरणी १६ हजार ८०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या