शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शाळांत विद्यार्थ्यांऐवजी ठेवणार धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

शासनाच्या किमान समर्थन मुल्य योजनेनुसार आधारभूत धान खरेदी केंद्राअंतर्गत उन्हाळी धान खरेदीसाठी आवश्यक धान्य गोदामे उपलब्ध न झाल्याने पर्यायी ...

शासनाच्या किमान समर्थन मुल्य योजनेनुसार आधारभूत धान खरेदी केंद्राअंतर्गत उन्हाळी धान खरेदीसाठी आवश्यक धान्य गोदामे उपलब्ध न झाल्याने पर्यायी गोदामांची व्यवस्था म्हणून शाळांमध्ये धान ठेवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांऐवजी धान ठेवले जाणार आहेत.

गत खरीपात आधारभूत धान खरेदी केंद्राअंतर्गत खरेदी केलेल्या धानाची अद्याप उचल न करण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व धान्य गोदामे तुडुंब भरली आहेत. तथापि गत काही दिवसांपुर्वी उचल आदेशाअंतर्गत धानाची उचल व पिसाई करण्यात आली. मात्र पिसाई झालेल्या तांदळाची खाद्यान्न पुरवठा विभागाअंतर्गत नियुक्त उचल प्रतिनीधीद्वारे तांदळाची उचल न करण्यात आल्याने सर्वत्रच धान उचलीला ब्रेक लागला आहे.

उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या धान खरेदीसाठी आवश्यक गोदामांची सोय उपलब्ध होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी शासकीय धान खरेदी योजनेपासून वंचित राहु नये यासाठी शासनाच्या पणन विभागा अंतर्गत जिल्हा परीषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये धान खरेदीसाठी वेगवेगळ्या अटींवर परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची जागा धानपोती घेणार आहे.

शासकीय योजनेनुसार उन्हाळी धान खरेदीसाठी गोदाम उपलब्ध होत नसल्याने भंडारा जिल्हा परीषद सीईओद्वारा पर्यायी गोदामांची व्यवस्था म्हणून जिल्हा परीषदेच्या प्राथमिक तथा माध्यमिक शाळांना उपलब्ध करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे. मात्र सदरील निर्देश केवळ जिल्हा परीषदेच्या शाळांसाठी असून खाजगी शाळांना सवलत दिल्याने ग्रामीण भागातील पालकांसह नागरीकांत प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे.

बॉक्स

गरीब विद्यार्थ्यांच्या मुलभूत अधिकारावर कोरोनामुळे दोन वर्षापासुन विद्यार्थ्यांच्या दोन पिढया नष्ट होण्याचा आरोप नागरीकांत केला जात आहे. शासनाने शिक्षण हे मुलभुत अधिकार असल्याची पुष्टी केली आहे. मात्र कागदावर मुलभुत अधिकाराची पुष्टी करणारे शासन वास्तवात शिक्षण व्यवस्थेवर दुर्लक्ष करीत आहे. जिल्हा परीषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या मुलभुत अधिकारावर वार केल्याचा आरोप आहे.