शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीडीएस बंद असल्याने शिक्षक कर्मचाऱ्यांचे जीपीएफ निघणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या दरमहिन्याच्या वेतनातून जीपीएफची ठरावीक रक्कम आपल्या जीपीएफ खात्यात जमा करीत असतात. अत्यंत आवश्यक किंवा ...

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या दरमहिन्याच्या वेतनातून जीपीएफची ठरावीक रक्कम आपल्या जीपीएफ खात्यात जमा करीत असतात. अत्यंत आवश्यक किंवा सेवानिवृत्त होतेवेळी ही रक्कम कर्मचाऱ्यांना काढता येते. कोरोनाकाळात महाराष्ट्र व इतर राज्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. हे कारण समोर करून शासनाने संगणक प्रणालीतून अर्थसंकल्प अधिकारपत्र (बी.डी.एस.) निघाल्याशिवाय कर्मचारी यांना रक्कम अदा करू नयेत, असे पत्रक शासनाने काढले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी अडचणीत आले आहे. आधी ही पद्धत नव्हती. जीपीएफ प्रकरण कर्मचारी यांना मंजूर करावयाचे असल्यास अधीक्षक, जीपीएफ व वेतन पथक, यांच्याकडून प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तो शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे जात असे. तेथून मंजूर झाल्यावर कोषागार कार्यालयात पाठविले जात होते. तेथून सरळ कर्मचारी यांच्या खात्यात जमा होत असे. पण, सध्या बी.डी.एस. निघणे बंद असल्याने जीपीएफ प्रकरण वेतन पथक कार्यालयात अधीक्षक व शिक्षणाधिकारी यांची मंजुरी घेऊन पडून आहेत. त्यामुळे शिक्षक व कर्मचारी प्रचंड आर्थिक अडचणीत आले आहेत. अनेक कर्मचारी तीन ते चार महिने सेवानिवृत्त होऊन गेले, पण त्यांची हक्काची नापरतावा रक्कम मिळाली नाही. कोरोनाकाळात अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ते व त्यांचे कुटुंब आजारी पडले. त्यांना लाखो रुपये लागले. अनेकांनी घर, प्लाॅटखरेदी करून त्यांच्या शाळेतर्फे प्रस्ताव पाठविले. पण, गत तीन महिन्यांपासून मंजूर झाले नाही. म्हणून कर्मचारी अडचणीत आले आहे. शासनाने बीडीएस प्रणाली सुरू करून कर्मचारी यांची हक्काची रक्कम त्यांना देण्याची मागणी खासगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केली आहे.