शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
3
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
4
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
5
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
6
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
7
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
8
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
9
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
10
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
11
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
12
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
13
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
14
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
15
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
16
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
17
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
18
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
19
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
20
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
Daily Top 2Weekly Top 5

पालांदुरात वीज कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: February 8, 2015 23:30 IST

परिसरातील शून्य भारनियमन सुरु असतांना मागील महिन्याभरापासून भारनियमन सुरु झाले आहे. स्थानिक प्रतिनिधी, ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी, तोंडी कळवूनही सुधारण झाली नाही.

पालांदूर : परिसरातील शून्य भारनियमन सुरु असतांना मागील महिन्याभरापासून भारनियमन सुरु झाले आहे. स्थानिक प्रतिनिधी, ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी, तोंडी कळवूनही सुधारण झाली नाही. अखेर दामाजी खंडाईत यांच्या नेतृतवात वीज कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वीज अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारुन भारनियमन कमी करण्याचे आश्वासन दिले.जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी मोर्च्याच्याच दिवशी असलेल्या जिल्हा नियोजन समितीपुढे भारयनियमाचा प्रश्न उभा केला. यावर पालकमंत्री दिपक सावंत, अधिक्षक अभियंता मेश्राम, कार्यकारी अभियंता धनविजे, जिल्हाअधिकारी आदीनी भारनियमनाचा प्रश्न निकाली काढीत आठ दिवसात वीज सुरळीत करण्याची ग्वाही दिली. खासदार नाना पटोले यांनीसुध्दा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करुन येत्या १० दिवसात पालांदूरचे भारनियमन कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.मोर्चा गांधी चौक - बसस्थानक मार्गे सरळ वीज कार्यालयावर धडकला. भारनियमन बंद करा, सिंगल फेस बंद करा अशा घोषणा करीत मोर्चेकरांनी आक्रोश व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे ऐकत मोर्चेकरांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत थेट मोर्च्यात आले. दामाजी खंडाईत, तुळशीराम भुसारी, कृष्णा जांभुळकर, इद्रिस लध्धानी, सरपंच शुभांगी मदनकर, वैशाली खंडाईत, हेमंत सेलोकर, प्रतिभा सेलोकर आदीनी मोर्च्याला संबोधित केले.मोर्च्याला प्रा. आनंदराव मदनकर, हेमराज कापसे, विजस कापसे, मंगेश येवले, महेश हटवार, उमेश हटवार, रमेश हटवार, रोहिणी सेलोकर, कौशल्या वैरागडे, राजु पठाण, ईश्वर तलमले, इम्ररान भुरा आदीनी सहकार्य केले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. (वार्ताहर)