शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
3
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
4
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
5
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
6
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
7
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
8
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
11
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
12
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
13
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
14
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
15
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
17
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
18
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
19
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
20
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन सुविधांअभावी शेतकरी सापडले संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकºयांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही. ही खरी शोकांतिका आहे. शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनकरीता दिले जात आहे. शासनाला यामाध्यमातून मोठा महसूल मिळतो. तरीही तलांवांच्या जिल्ह्यात शासन कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धान पिकासाठी संघर्ष करावा लागत आहे.

ठळक मुद्देतुमसर तालुका : बंधाऱ्यांचीही स्थिती चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सिंचनाच्या सोयी सुविधा पुर्ण केल्या असे शासन म्हणत असले तरीही आज तुमसर तालुक्यात अनेक गावात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांची शेती संकटात आली आहे. तालुक्यातील अनेक गावामध्ये राज्य शासनाने रोजगार हमी योजने अंतर्गत शासकीय तलावांची निर्मीती केली. परंतु ४० वर्ष लोटूनही तलावांच्या नहराचे बांधकाम अर्धवट आहेत.
तलावामध्ये मुबलक पाणी असते, परंतु शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पोहचत नाही. ही खरी शोकांतिका आहे. शासनातर्फे तलावाचे लिलाव मासेपालनकरीता दिले जात आहे. शासनाला यामाध्यमातून मोठा महसूल मिळतो. तरीही तलांवांच्या जिल्ह्यात शासन कालव्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांना एका पाण्यासाठी प्रत्येक वर्षी धान पिकासाठी संघर्ष करावा लागत आहे. पीक नष्ट होवून नुकसान सहन करावा लागतो. सन १९८० मध्ये केंद्रीय नवीन वन कायद्यामुळे अर्धवट नहराचे निर्माण कार्य थांबले आहे. त्याचप्रकारे बावनथडी सिंचन प्रकल्प राजीवसागरचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहेत. जवळील मध्यप्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यामध्ये प्रकल्पांचे नहर व्यवस्थित असून त्या क्षेत्रामध्ये सिंचन कार्य मागील दोन वर्षापासून चांगल्या पद्धतीने सुरू आहे. परंतु महाराष्ट्रातील नहराचे कार्य अजुनही अर्धवट पडलेले आहे. जे नहर बनले आहेत तेही आता दुरुस्तीला आले आहेत. नहराचे सिमेंटीकरण करण्याची आवश्यकता आहे.
तुमसर तालुक्यातील अनेक गावांच्या शेतशिवारात प्रकल्पाचे निर्माण कार्य करण्यात आले. त्यामुळे तेथील तीन गावाचे पुनर्वसन झाले आहे. गावांचे पुनर्वसन झाले तरी अद्यापही गावकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या समस्या कायमच आहेत.

कालव्यांच्या दुरुस्तीची गरज
तालुक्यात मोठे सिंचन प्रकल्प असतांनाही शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. वर्षानुवर्षे कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने शासनाने ग्रामीण भागातील शेतशिवारात असणारा कालवा दुस्तीची कामे त्वरित करण्याची गरज आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी पाणी पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांतून ओरड होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती