शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

सौभाग्याच्या प्रतिकाने महिलांना दिला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST

तालुक्यातील ग्राम खैरबोडी, चुरडी, चिखली, गराडा व काचेवानी या गावातील महिलांचा समावेश होता. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा उत्साह व आनंद तसेच लाख बांगडी निर्मिती मधून त्यांना मिळणारा मोबदला बघता तालुक्यातील इतर गावातील महिलांनी सुद्धा अदाणी फाऊंडेशनकडे प्रशिक्षणाची मागणी केली. यावरून ग्राम मंगेझरी, गोंवीदटोला, घोटी, कोडेबर्रा, रामाटोला व टीकारामटोला या गावातील एकूण ७० महिलांना २ टप्प्यात १२-१२ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.

ठळक मुद्देअदाणी फाऊंडेशनच पुढाकार : महिलांना लाखेच्या बांगडी तयार करण्याचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : भारतीय संस्कृतीत बांगडी हा महिलांचा अलंकार व सौभाग्याच लेणं संबोधले जाते. तसेच विविध सण समारंभामध्ये सुद्धा या अलंकाराचे अनन्य साधारण महत्व प्राचीन काळापासून आहे. या बाबीचा विचार करुन अदाणी फाऊंडेशनचे तत्कालीन स्टेशन हेड सी.पी.साहू यांच्या मार्गदर्शनात व अदाणी फाऊंडेशनचे हेड नितीन शिराळकर यांच्या नेतृत्वात अदाणी फाऊंडेशनच्या आजीविका कार्यक्रमातंर्गत महिलांना लाख बांगडी निर्मिती प्रशिक्षण दिले जात आहे.
तालुक्यातील ग्राम खैरबोडी, चुरडी, चिखली, गराडा व काचेवानी या गावातील महिलांचा समावेश होता. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचा उत्साह व आनंद तसेच लाख बांगडी निर्मिती मधून त्यांना मिळणारा मोबदला बघता तालुक्यातील इतर गावातील महिलांनी सुद्धा अदाणी फाऊंडेशनकडे प्रशिक्षणाची मागणी केली. यावरून ग्राम मंगेझरी, गोंवीदटोला, घोटी, कोडेबर्रा, रामाटोला व टीकारामटोला या गावातील एकूण ७० महिलांना २ टप्प्यात १२-१२ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले.
तसेच प्रशिक्षीत महिलांना अदाणी फाऊंडेशनच्या मार्फत लाख बांगडी बनविण्याकरीता लागणारे साहित्य जसे चूल, तावा, डाया, मुसळ, हाथा तसेच कच्चा लाख आणि रंग पुरविण्यात आले. त्यानंतर बालाघाट येथील दुल्हनदेवी संस्थेसोबत प्रशिक्षीत महिलांचा करार करून देण्यात आला.
अदाणी फाऊंडेशनद्वारा लाख बांगडीची विक्री करण्याकरीता प्रदर्शनी तसेच दुर्गा उत्सव, गणेश उत्सव, शांतीग्राम टावूनशीप या ठिकाणी विक्री केंद्र लावण्यात येते. याद्वारे ग्रामीण भागातील महिलांना मार्केटिंगचे धडे देण्यात येत आहे. तसेच प्रगतीशील महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आधिराक्षी या नावाने अ‍ॅमेझॉनवर लाख बांगडी विक्रीकरीता उपलब्ध आहे. अदाणी फाऊंडेशनचा हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांची कौशल्यवृद्धी तसेच आर्थिक उन्नती व त्यांच्या कुटुंबाच्या उत्पनात वाद करण्याकरीता कारणीभूत ठरत आहे.

कुटुंब व समाजात मान मिळवून दिला
प्रशिक्षण घेतलेल्या महिला १ दिवसात घरची सर्व कामे करुन ३०-३५ बांगडी जोड तयार करतात. त्यामधून त्यांना महिन्याला ३५०० ते ४००० रुपये मोबदला मिळतो. या व्यवसायामुळे त्या आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावू शकत आहेत. हा व्यवसाय कुटुंब तसेच समाजात मान-सन्मान मिळवून देत असल्याचे ललीता शालीकराम पटले यांनी सांगीतले.

टॅग्स :Womenमहिलाbusinessव्यवसाय