शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
2
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
3
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
4
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
5
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
6
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
7
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
8
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
9
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
10
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
11
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
12
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
13
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
14
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
15
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
16
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
17
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
18
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
19
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
20
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता अभिकर्त्याचा आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:01 IST

अलिम खाँ ईस्माईल खाँ पठाण(४७) रा बारव्हा असे मृतक वसुली अभिकर्त्याचे नाव आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीवरुन दिघोरी पोलीसांनी तपास व शोध मोहिम राबविली असता तब्बल महिनाभरानंतर बेपत्ता वसुली अभिकत्यार्चा मृतदेहच आढळला.

ठळक मुद्देघातपाताची शक्यता : दांडेगाव जंगलातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : एका पतसंस्थेअंतर्गत कार्य करीत असलेला वसुली अभिकर्ता व महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या इसमाचा सोमवारी दांडेगावच्या घनदाट जंगलात मृतदेह आढळला. अलिम खाँ ईस्माईल खाँ पठाण(४७) रा बारव्हा असे मृतक वसुली अभिकर्त्याचे नाव आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीवरुन दिघोरी पोलीसांनी तपास व शोध मोहिम राबविली असता तब्बल महिनाभरानंतर बेपत्ता वसुली अभिकत्यार्चा मृतदेहच आढळला.
माहितीनुसार, अलिम खाँ पठाण हे १७ जुन रोजी बारव्हा येथुन लाखांदुर येथे स्वत:चे दुचाकी क्रमांक एम एच ३६ ई २८२६ ने गेला होता. यावेळी घरुन निघुन जात असताना त्यांच्या खिशात अंदाजे ५० हजार रुपये रोख रक्कम होती. संध्याकाळी ऊशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. शोधाशोध करुनही माहिती न मिळाल्याने कुटुंबियांनी १८ जुन रोजी दिघोरी पोलीसांत बेपत्ता झाल्याची तक्रार केली.
तक्रारीवरुन दिघोरी पोलीसांनी तब्बल महिनाभर तपास चक्रे फिरविली असता अखेर दांडेगाव येथील घनदाट जंगलात दुचाकीसह कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. दांडेगाव वनक्षेञात वनमजुर म्हणुन कार्यरत ए. एन. कुळसुंगे यांना गस्तीवर असताना मृतदहे आढळला. वनमजुराने याची माहिती लाखांदूर वनपरीक्षेत्र कार्यालयासह दिघोरी पोलीसांना दिली. वनपरिक्षेत्राधिकारी आर.एस. दोनोडे, वनरक्षक एस. जी. खंडागळे, वनपाल व्हि. बी. पंचभाई, वनरक्षक जी.डी. हत्ते , बि एस पाटील , ठाणेदार निलेश गावंडे , पो हवा. विष्णु थंडार्ते यांसह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी आढळली दुचाकी व चप्पल
ज्या ठिकाणी अलिम खाँ यांचा मृतदेह आढळला घटनास्थळापासुन अंदाजे १० ते १२ फूट अंतरावर पठाण यांची दुचाकी आढळली. ५ ते ७ फूट अंतरावर त्यांची चप्पल आढळली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एका बांबुच्या झाडालगत आढळुन आला. त्यांची हत्या तर झाली नसावी, असा कयास व्यक्त केला जात आहे. शेवटच्या वेळी त्यांच्याजवळ रोख रक्कम होती. यावरून त्यांचा कुणी घात केला नसावा, अशी चर्चा आहे.