शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार ! जंगलात आग लावाल तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 05:00 IST

भंडारा वनविभागातील सर्वच क्षेत्रात फेब्रुवारी ते जून या कालावधीत वणव्यापासून वनसंपतीचे रक्षण करण्यासाठी याेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वनकर्मचाऱ्यांना जागते रहाेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रात जाळ रेषा तयार करणे, ब्लाेअर मशीनचा वापर अग्निरक्षकाची नेमणूक आणि रात्रंदिवस वणवा संवेदनशील क्षेत्रात गस्त आदी बाबींचा समावेश आहे. वणवा नियंत्रणासाठी ॲक्शन प्लॅंट तयार करण्यात आला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनसंपदेने नटलेल्या जिल्ह्यातील जंगलात उन्हाळ्यात आगी लागण्याच्या घटना माेठ्या प्रमाणात घडतात. यामुळे जैवविविधता धाेक्यात येते. जंगलात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने कंबर कसली  आहे. जंगलात आग लावणाऱ्यांना थेट कारागृहात पाठविण्याची तयारी वनविभागाने केली आहे.भंडारा वनविभागातील सर्वच क्षेत्रात फेब्रुवारी ते जून या कालावधीत वणव्यापासून वनसंपतीचे रक्षण करण्यासाठी याेजना कार्यान्वित करण्यात आली आहे. वनकर्मचाऱ्यांना जागते रहाेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वनक्षेत्रात जाळ रेषा तयार करणे, ब्लाेअर मशीनचा वापर अग्निरक्षकाची नेमणूक आणि रात्रंदिवस वणवा संवेदनशील क्षेत्रात गस्त आदी बाबींचा समावेश आहे. वणवा नियंत्रणासाठी ॲक्शन प्लॅंट तयार करण्यात आला आहे. वनसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी जागृक नागरिकांनी पुढाकर घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  जागते रहाेचे आदेश- वनक्षेत्रालगत असलेल्या शेतांमध्ये काम करताना कचरा पेटवून दिला जाताे. गवत चांगले यावे यासाठी आग लावून दिली जाते. वनातून जातांना बिडी, सिगारेट फेकली जाते. त्यामुळे आग लागून माेठे नुकसान हाेते. यावर नियंत्रणासाठी वनकर्मचाऱ्यांना जागते रहाेचे आदेश देण्यात आले आहे.

हाेवू शकताे एक वर्ष कारावास, अन् पाच हजार रुपये दंड- राखीव वनात आग लावल्यास, विस्तव पेटविल्यास किंवा जळता विस्तव साेडल्यास एक वर्षापर्यंत कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा हाेऊ शकते. नागरिकांनी आगीवर नियंत्रणासाठी वनविभागाला सहकार्य करावे. आगीची सूचना वनविभागाच्या टाेल फ्री क्रमांक १९२६ वर  द्यावी, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

टॅग्स :forestजंगलfireआग