शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST

बापलेक दोघेही काही कामानिमित्त दुचाकी क्रमांक एम एच ३६ एस ५२६३ ने शहापूरला गेले होते. परतीच्या प्रवासात महामार्गावरील दवडीपार फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना त्यांच्या दुचाकीला चारचाकी क्रमांक एम एच ३१ डीसी १०१० ने जोरदार धडक दिली. यात हेमराज हा चारचाकी वाहनाच्या बोनेटवर जोरदार आदळला.

ठळक मुद्देवडील गंभीर : दवडीपार फाट्यावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : शहापूरहून भंडाराकडे दुचाकीने येत असलेल्या बापलेकाला मागेहून येणाऱ्या कारने धडक दिली. यात मुलगा जागीच ठार झाला, तर वडील गंभीर जखमी झाले. हेमराज देवदास वैद्य (३६) रा. दवडीपार (बेला) असे मृताचे नाव आहे.
वडील देवदास वैद्य यांना गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील दवडीपार फाट्याजवळ घडली.
बापलेक दोघेही काही कामानिमित्त दुचाकी क्रमांक एम एच ३६ एस ५२६३ ने शहापूरला गेले होते. परतीच्या प्रवासात महामार्गावरील दवडीपार फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना त्यांच्या दुचाकीला चारचाकी क्रमांक एम एच ३१ डीसी १०१० ने जोरदार धडक दिली. यात हेमराज हा चारचाकी वाहनाच्या बोनेटवर जोरदार आदळला. अपघातानंतर चारचाकी वाहन ५० फुटावर असलेल्या विद्युत खांबाला जाऊन आदळली.
नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीररित्या जखमी झालेल्या हेमराजला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
साकोली : एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने भावेश कोटांगले (४४) हे जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास साकोली विहिरगाव मार्गावर घडली. एसटी क्रमांक १२ ईएफ ६९१९ असून ती भूगावहून साकोलीकडे जात होती. याच दरम्यान हा अपघात घडला. साकोली पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू