शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Astro Tip: गुण जमले पण ग्रह फिरले तर? विवाहापूर्वी पत्रिकेतील 'या' पापग्रहांच्या स्थितीकडे मुळीच दुर्लक्ष करू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:18 IST

Astro Tip: विवाह ठरवताना केवळ 'गुण' पाहताय? सावधान! पत्रिकेतील पापग्रहांची 'ही' स्थिती ठरू शकते संसारातील डोकेदुखी; कशी ते पाहा.

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

विवाह ठरवताना गुणमिलन आणि ग्रहमिलन ही दोन्ही करणे अनिवार्य आहे; कारण गुणमिलनाचाच पुढील अध्याय म्हणजे ग्रहमिलन होय. यात सर्वात महत्त्वाच्या ठरतात त्या 'दशा' आणि 'दशास्वामींचा' परस्परांशी असलेला सुसंवाद (रजामंदी). अनेक वेळा पत्रिकेतील पापग्रहांची स्थिती विवाहात अडथळे आणणारी किंवा विवाहपश्चात दोघांमध्ये मतभेद आणि दुराव्यास कारणीभूत ठरते. ते कसे, हे आज आपण पाहूया.

Numerology: श्रीरामांचं 'मर्यादा पुरुषोत्तम' होण्याचं रहस्य तुमच्याही जन्मतारखेत दडलंय! जाणून घ्या कसं

पापग्रहांची स्थिती आणि परिणाम:
शनी-मंगळ युती: पत्रिकेत शनी-मंगळ युती नसावी, विशेषतः १, ४, ७, ८ आणि १२ या भावांत ती अजिबात नसावी. तसेच प्रथम आणि सप्तम भावातून शनी-मंगळाचा 'प्रतियोग' (सप्तम दृष्टी) असू नये.

सप्तम भाव: ६, ७, ८ या भावांत पापग्रह असणे त्रासदायक ठरते; कारण त्यामुळे सप्तम भाव 'पापकर्तरी' योगात येतो. एकापेक्षा अधिक पापग्रह सप्तम भावात असणे किंवा पापग्रहांच्या दृष्टीत सप्तम भाव असणे हितावह नसते.

धन आणि सुख स्थान: द्वितीय भाव (धन/कुटुंब) आणि चतुर्थ भाव (सुखस्थान) यात पापग्रह असल्यास घरात कटकटी निर्माण होतात. संसार म्हणजे तडजोड असते, परंतु लग्न भावात शनी, मंगळ, हर्षल, नेपच्यून किंवा राहू यांसारखे पापग्रह असतील, तर त्यांची दृष्टी सप्तम भावावर पडते. यामुळे वैवाहिक सुख बिघडते.

Ram Navami 2026 Puja: रामनवमीला घरी पूजा कशी करावी? जन्मवेळ, पाळणा आणि राममंत्रांची संपूर्ण माहिती

मंगळाचे कुयोग: पत्रिकेत मंगळ असून त्यासोबत दोनपेक्षा अधिक पापग्रहांचे कुयोग असतील, तर वैवाहिक सौख्याची निश्चितपणे हानी होते.

दृष्टीचा प्रभाव: चतुर्थात मंगळ आणि दशमात शनी असेल, तर या दोन्ही ग्रहांची दृष्टी एकाच वेळी सप्तम भावावर पडते. अशा प्रकारे शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची दृष्टी सप्तम भावावर असणे विवाहातील विघ्नांना कारणीभूत ठरते.

शुक्र आणि गुरूची स्थिती: व्यय भावात (१२ व्या स्थानी) शुक्र हा कन्या, मकर, धनु किंवा कुंभ राशीत असून त्यावर शनी-मंगळाची दृष्टी असल्यास ती त्रासदायक ठरते.

शुक्राच्या राशीतील किंवा धनु राशीतील सप्तम भावातील गुरू विवाहासाठी पोषक नसतो. मुळात हे स्थान गुरूंना मानवणारे नाही.

हर्षल आणि नेपच्यूनचा प्रभाव:  सप्तम भावात हर्षल किंवा नेपच्यून असतील तर विवाहाच्या वेळी गोंधळ होणे, साखरपुडा किंवा लग्नाची तारीख ऐनवेळी बदलणे, अचानक विवाह ठरणे किंवा अचानक मोडणे, अशी गूढता दिसून येते. ही लक्षणे चांगली नाहीत. त्यामुळे अशा वेळी स्थळाची चौकशी अतिशय कसून करावी.

Ram Navami 2026: रामनवमीला मनगटावर बांधा ११ गाठींचा 'हा' धागा; तुमचे आणि कुटुंबाचे होईल संरक्षण!

मंगळ दोषाचा परिहार: 

संसार म्हटला की तडजोड आलीच, मात्र मिथुन राशीतील मंगळ तडजोड करत नाही. अनेकदा मंगळाची पत्रिका सरसकट नाकारली जाते. जगातील ९०% लोकांच्या पत्रिकेत मंगळ असतो, मग काय त्यांनी विवाह करायचा नाही का? तर तसे नसते.

जर गुरूच्या दृष्टीत मंगळ असेल, तर त्याचे नकारात्मक परिणाम कमी होतात.

मंगळ स्वराशीत किंवा स्वतःच्या उच्च (मकर) राशीत असेल, तर वाईट फळे मिळत नाहीत.

पत्रिकेत गुरू आणि शुक्र बलवान असतील, तर मंगळ दोषाचा परिहार होतो.

शनीची दृष्टी सप्तम भावावर, सप्तमेशावर, शुक्र किंवा चंद्रावर असेल, तर वैवाहिक सौख्याला उशिरा सुरुवात होते.

निष्कर्ष:

विवाह सुखावह होण्यासाठी केवळ गुणमिलनावर विसंबून न राहता, ग्रहमिलन करणे अत्यंत आवश्यक आहे. गुणमिलन केल्याशिवाय विवाह करू नका, हे मी पुन्हा पुन्हा नमूद करू इच्छिते.

श्री स्वामी समर्थ!

.....

Lokmat Media Group च्या डिजिटल उपक्रमांतर्गत सुरू केलेले Lokmatbhakti.com हे आध्यात्म, ज्योतिष आणि वैदिक शास्त्रांवर आधारित एक समर्पित व्यासपीठ आहे. या प्लॅटफॉर्मवर कुंडली विश्लेषण, अंकशास्त्र, विवाह जुळवणी (matchmaking) तसेच वास्तु मार्गदर्शन यांसारख्या सेवा पारंपरिक पद्धतींनुसार तयार करून दिल्या जातात. Lokmatbhakti.com वर उपलब्ध असलेले अहवाल आणि मार्गदर्शन हे अनुभवी तज्ञांच्या सल्ल्यावर आधारित असून त्यात अचूकता आणि प्रामाणिकपणाला विशेष महत्त्व दिले जाते. याशिवाय, येथे उपलब्ध असलेले धार्मिक आणि आध्यात्मिक कंटेंटही विश्वसनीय स्रोतांवर आधारित असल्याने वाचकांमध्ये याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Astro Tip: Don't ignore planetary positions in horoscope before marriage!

Web Summary : Horoscope matching is crucial before marriage. Afflictions from malefic planets like Saturn and Mars in specific houses (1, 4, 7, 8, 12) can cause marital discord. The positions of Venus and Jupiter also matter. Analyse thoroughly to avoid problems.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषmarriageलग्नrelationshipरिलेशनशिप