Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:24 IST2026-05-07T15:23:33+5:302026-05-07T15:24:25+5:30
Astro Tip: शुक्रवार हा देवीचा, लक्ष्मी मातेचा वार, ज्योतिष शास्त्रानुसार दर शुक्रवारी दिलेले उपाय केले असता घरात अन्न-धान्याची उणीव भासत नाही.

Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न
ज्योतिषशास्त्र आणि पौराणिक मान्यतेनुसार, शुक्रवार हा दिवस धनलक्ष्मी आणि सुख-समृद्धीचा कारक मानल्या जाणाऱ्या 'शुक्र' ग्रहाचा दिवस आहे. जर तुम्ही आर्थिक चणचणीचा सामना करत असाल किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधत असाल, तर शुक्रवारी केलेले काही विशेष उपाय अत्यंत फलदायी ठरू शकतात. कसे ते जाणून घेऊ.
हे ही वाचा : Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा 'या' वास्तु टिप्स
१. घराची स्वच्छता आणि मुख्य प्रवेशद्वार
देवी लक्ष्मीचा वास अशाच ठिकाणी असतो जिथे स्वच्छता असते. शुक्रवारी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करावे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याचा शिडकावा करून तिथे हळद-कुंकवाचे 'स्वस्तिक' काढावे. प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावणे अत्यंत शुभ मानले जाते, यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
२. श्री सूक्त आणि कनकधारा स्तोत्र पठण
आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावून 'श्री सूक्त' किंवा 'कनकधारा स्तोत्र' यांचे पठण करावे. जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल, तर मोबाईलवर हे स्तोत्र लावल्यानेही घरातील वातावरणात सकारात्मकता येते.
हे ही वाचा : Samudrik Shastra: चेहरा बघून ओळखा स्वभाव! गोल, चौकोनी की अंडाकृती? काय सांगतो तुमचा 'फेस शेप'?
३. पांढऱ्या वस्तूंचे दान (Shukra Remedies)
शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. शुक्रवारी गरजू व्यक्तींना दूध, दही, साखर, तांदूळ किंवा पांढरे कापड दान करावे. यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह शुभ फळ देऊ लागतो आणि भौतिक सुखांमध्ये वाढ होते.
हे ही वाचा : Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
४. लक्ष्मीला प्रिय नैवेद्य
देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य खूप प्रिय आहे. शुक्रवारी लक्ष्मीला साखरफुटाणे किंवा तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. हा प्रसाद घरातील सर्व सदस्यांना दिल्याने घरात आनंदी वातावरण राहते.
५. कमळाचे फूल आणि अत्तर
लक्ष्मीला कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे. शक्य असल्यास शुक्रवारी लक्ष्मीच्या चरणी लाल किंवा गुलाबी रंगाचे कमळाचे फूल अर्पण करावे. तसेच, पूजेच्या वेळी अत्तराचा (विशेषतः गुलाबाचे अत्तर) वापर केल्याने शुक्र ग्रहाची कृपा प्राप्त होते आणि आर्थिक आवक वाढते.