अंगारकी ते अंगारकी: १५ दिवस ३ उपासना करा, १ मिनिट लागेल; बाप्पा हवे ते देईल, पुण्य लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:13 IST2026-05-05T13:06:32+5:302026-05-05T13:13:25+5:30

Angarki Chaturthi Vrat 2026: मे महिन्यातील दोन्ही चतुर्थी अंगारक योगात आहेत. संकष्ट चतुर्थी ते विनायक चतुर्थी नेमके काय करावे? जाणून घ्या...

angarki sankashti chaturthi to vinayak chaturthi angarak yog may 2026 do 3 worship for 15 days it take just 1 minute ganpati bappa give you whatever you want gain merit forever | अंगारकी ते अंगारकी: १५ दिवस ३ उपासना करा, १ मिनिट लागेल; बाप्पा हवे ते देईल, पुण्य लाभेल!

अंगारकी ते अंगारकी: १५ दिवस ३ उपासना करा, १ मिनिट लागेल; बाप्पा हवे ते देईल, पुण्य लाभेल!

Angarki Chaturthi Vrat 2026: सन २०२६ चा मे महिना अतिशय विशेष असा आहे. या एकाच महिन्यातील दोन्ही चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. एकाच महिन्यात दोन अंगारक योग जुळून येणे ही दुर्मिळ बाब मानली जाते. या दोन्ही अंगारकी चतुर्थींपैकी एक चतुर्थी तर अधिक महिन्यात येणारी आहे. त्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढल्याचे म्हटले जात आहे. या दोन्ही अंगारकी चतुर्थीच्या कालावधीत तीन उपासना सलग केल्यास गणपती बाप्पा तर शुभाशिर्वाद देईल, उत्तम पुण्य लाभू शकेल, असे म्हटले जात आहे. 

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! गणपती ही वैश्विक देवता आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे, रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. याच गणपतीची प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थी आणि वद्य चतुर्थी या तिथींना विशेष उपासना, व्रत केले जाते. मे महिन्यात वैशाख वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आला असून, अधिक मास असलेल्या ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला म्हणजेच विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे.

संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी विशेष व्रत

गणपती शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात चतुर्थी तिथीला गणपती पूजन केले जाते. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ असे म्हटले जाते. विनायक चतुर्थी ही माध्यान्हव्यापिनी असावी लागते. अर्थात त्यात सूर्य दर्शनाला महत्त्व असते. तर प्रत्येक मराठी मासातील वद्य चतुर्थीला ‘संकष्ट चतुर्थी’ म्हणतात, त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो, म्हणजे ती चंद्रोदयव्यापिनी असावी लागते. त्यात चंद्र दर्शनाला महत्त्व असते. संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो, परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे, असे शास्त्रात म्हटले आहे. 

चतुर्थीला अंगारक योगाचे अनन्य साधारण महत्त्व

विनायक चतुर्थी किंवा संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की, तिला ‘अंगारक योग’ असलेली चतुर्थी मानतात. अंगारक म्हणजे मंगळ. अशी चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे. याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात, असे सांगितले जाते. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेशमंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला, की, माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल!

अधिक मास अन् चतुर्थीला अंगारक योगाचा दुर्मिळ योगायोग

मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो. फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत अधिक मास पाळला जातो, असे सांगितले जाते. यंदा ज्येष्ठ महिना अधिक मास आला आहे.  रविवार, १७ मे २०२६ रोजी अधिक ज्येष्ठ सुरू होत आहे. यानंतर लगेचच मंगळवारी विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. 

संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी अंगारक योग

मराठी वर्षाच्या वैशाख मासात मंगळवार, ०५ मे २०२६ रोजी संकष्ट चतुर्थी अंगारक योग आहे. या दिवशी पहाटे ०५ वाजून २४ मिनिटांनी वैशाख वद्य चतुर्थी म्हणजेच संकष्ट चतुर्थी सुरू होत असून, ०६ मे २०२६ रोजी सकाळी ०७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत संकष्ट चतुर्थी असणार आहे. याचाच अर्थ ही अंगारकी संकष्टी चतुर्थी अहोरात्र असणार आहे. तर, मंगळवार, १९ मे २०२६ रोजी विनायक चतुर्थी अंगारक योग आहे. 

अंगारकी ते अंगारकी १५ दिवस ३ उपासना करा

- दररोज सकाळी उठल्यावर मनापासून गणपती बाप्पाला मनापासून नमस्कार करा.

- २१ दुर्वांची जुडी किंवा शक्य असतील तितक्या दुर्वा गणपतीला अर्पण करा.

- गणपतीचे आवडते जास्वंद फूल अर्पण करा.

- मराठीतील गणपती संकटनाशनं स्तोत्र म्हणा.

- या उपासना करायला केवळ १ मिनिटाचा कालावधी लागेल.

मराठीत श्री संकटनाशनं गणेश स्तोत्र

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका ।

भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ।।१।।

प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें ।

तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ।।२।।

पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें ।

सातवे विघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ।।३।।

नववे श्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक ।

अकरावे गणपति बारावे श्रीगजानन ।।४।।

देव नावे अशी बारा तीनसंध्या म्हणे नर ।

विघ्नाभिती नसेत्याला प्रभो! तू सर्वसिद्धी दे ।।५।।

विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन ।

पुत्रर्थ्याला मिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ।।६।।

जपता गणपति गणपतिस्तोत्र सहा मासात हे फळ।

एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ।।७।।

नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे ।

श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ।।८।।

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

Web Title : अंगारकी चतुर्थी 2026: शुभ मुहूर्त, पूजा विधि और लाभ

Web Summary : मई 2026 में दो अंगारकी चतुर्थी का दुर्लभ संयोग है। इस दौरान तीन सरल गणपति उपासना करने से आशीर्वाद और पुण्य की प्राप्ति होती है। संकटनाशन स्तोत्र का पाठ करें और मनोकामना पूर्ति के लिए दुर्वा अर्पित करें।

Web Title : Angarki Chaturthi 2026: Auspicious time, worship, and benefits explained.

Web Summary : May 2026 features two Angarki Chaturthis, a rare occurrence. Performing three simple Ganpati Upasanas during this period is believed to bring blessings and merit. Recite the Sankatnashan Stotra and offer Durva for fulfillment.