शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय निवासी शाळेची ‘स्पाॅट ॲडमिशन’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : अनुसूचित जातीसह वंचित घटक व ऊसतोड मजुरांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक शैक्षणिक फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : अनुसूचित जातीसह वंचित घटक व ऊसतोड मजुरांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक शैक्षणिक फटका बसत आहे. हे सर्व टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी शासकीय निवासी शाळेने थेट स्पाॅट ॲडमिशन मोहीम सुरू केली.

कोरोनामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले, तरी त्यात अनंत अडचणी आहेत. स्पॉट ॲडमिशन मोहिमेसाठी मुख्याध्यापक अस्मिता जावळे यांच्यासह शिक्षक आदिवासी, भिल्ल, पारधी वस्ती, तांडे, खडी क्रेशर, वीट भट्ट्यांवर पोहोचले आहेत. शासकीय निवासी शाळेत या विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन आदी सर्व शैक्षणिक सुविधा मोफत मिळत आहेत. आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान करू नका, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका, या बाबी पालकांना समजावून सांगितल्या जात आहेत. शिवाय ऑनलाईन शिक्षण असले, तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अँड्राॅईड मोबाईल असला तर रिचार्ज करणे, केलाच तर लाईट नसल्यास चार्जिंग कशी करणार? नेट उपलब्ध नसणे या कारणाने अडथळे येत असतात. याची जाणीव करून दिली जात आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व सांगितले जात आहे. मोहिमेव्दारे पालकांचे मतपरिवर्तन केले जात असल्याचे मुख्याध्यापिका अस्मिता जावळे यांनी सांगितले.

मोहिमेत शिक्षक शिवाजी पाचे, सुनील फड, रामलिंग खेडकर, संतोष सानप, अश्विनी मुळे, अंजली देवकते, पृथ्वीराज जावळे, बोरूडे, सिरसाट आदींची टीम थेट स्पाॅटवर पोहोचत आहे.

....

‘स्पाॅट ॲडमिशन’ मोहिमेमुळे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची राष्ट्रीय स्वच्छ पुरस्कार प्राप्त शाळा आपल्या दारी आल्याची भावना पालकात निर्माण होत आहे. यामुळे पालकांची मानसिकता बदलत असून मोहिमेचा उद्देश साध्य होत आहे.

-अस्मिता जावळे, मुख्याध्यापक.

===Photopath===

230621\img-20210622-wa0027.jpg

===Caption===

फोटो स्पाॅट अॅडमिशन मोहीम सुरू